Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

वाडियापार्क येथील जलतरण तलावातील पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका – भगवान फुलसौंदर

Share
वाडियापार्क येथील जलतरण तलावातील पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका - भगवान फुलसौंदर, Latest News Vadiya Park Swimming Pool Water Help Problems Fulsaundar Demand Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- पोहण्याने नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे नगर शहरातील नागरिक मोठया प्रमाणात वाडीयापार्क येथे असलेला जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी येत आहेत. हा तलाव ए के ग्रुप या खाजगी संस्थेला दिलेला आहे. गेल्या एक महिन्यापासून तलावाचे पाणी अतिशय अशुध्द व दुर्गंधीयुक्त झालेले आहे.

या जलतरण तलावाकडे या संस्थेचे अक्षरशा दुर्लक्ष झालेले आहे. वारंवार क्रीडा अधिकारी प्रशासनाकडे सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष करतात. आज पर्यत या संस्थेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. नगर शहरातील नागरिक वार्षिक सभासद आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. त्वचा रोग होण्याची दाट शक्यता आहे. तरी लवकरात लवकर या तलावाचे जलशुध्दीकरण व यंत्रणेची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी श्री.राहुल द्विवेदी यांचेकडे करण्यात आली आहे.

लवकरात लवकर हे काम न झाल्यास आंदोलन करण्यात येईल अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर व नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!