Type to search

Featured नाशिक

येवला : बेरोजगार तरुणाला मिळाली रोजगाराची संधी

Share

राजापूर:

येवला तालुक्यातील सोमठाणजोश येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण रामेश्वर रघुनाथ चवडगिर या तरुणाला जिल्हा परिषद अंतर्गत चार चाकी वाहनाचे वितरण शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारभारी पाटील आगवन हे होते.

राजापूर जिल्हा परिषद राजापूर गटाच्या सदस्या सुरेखाताई दराडे यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत वीस टक्के अनुदानावर चार चाकी वाहनाचे वाटप करण्यात आले. येवला तालुक्याचे शेवटचे टोक सोमठाणजोश हे गाव असून या गावातील तरुण रामेश्वर चवडगिर या तरुणाला जिल्हा परिषद मार्फत चार चाकी वाहन 20 टक्के अनुदानावर देण्यात आले. कुणाल दराडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या योजनेचा लाभ सोमठाणजोश येथील रामेश्वर चवडगिर या तरुणाला रोजगार उपलब्ध झाला आहे.

त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. शहीद जवान नवनाथ कारभारी आगवन यांच्या स्मारकाला पेव्हर ब्लॉक देण्याचे आश्वासन कुणाल दराडे यांनी दिले आहे.

या प्रसंगी माजी सभापती पोपटराव आव्हाड, येवला तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन लक्ष्मण घुगे, माजी सरपंच रामभाऊ केदार, परसराम दराडे, प्रमोद बोडके, एकनाथ सदगीर, बारकू शिंगाडे, ग्रामविस्तार अधिकारी रामदास मंडलिक, माधव आगवन, निवृत्ती पठाडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!