Wednesday, April 24, 2024
Homeनगर7800 ब्रास दगडाचे अनधिकृत उत्खनन खाण जमीन मालकाला 8 कोटींच्या दंडाची नोटीस

7800 ब्रास दगडाचे अनधिकृत उत्खनन खाण जमीन मालकाला 8 कोटींच्या दंडाची नोटीस

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील नजीक चिंचोली शिवारातील शेती गट नंबर 69/2 मध्ये दगड खाणीतून सुमारे 7800 ब्रास दगडाचे अनधिकृत उत्खनन झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने नेवासा तहसीलदारांनी खाण जमीन मालकाला 8 कोटी 11 लाख 20 हजार 125 रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.

नेवासा तहसीलदारांनी 23 डिसेंबर रोजी नजीक चिंचोली शिवारातील शेती गट नंबर 69/2 मध्ये सुरू असलेल्या अनधिकृत दगडखाण उत्खननाची चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश कुकाणा मंडलाधिकार्‍यांना दिले होते. त्यानुसार 23 रोजी कुकाणा मंडलच्या मंडलधिकार्‍यांनी नजीक चिंचोली येथे सुरू असलेल्या दगड खाणीची पाहणी करून उत्खननाचा रितसर पंचनामा केला.

- Advertisement -

या चौकशीतून गिरीश गंगाधर आरसुळे व दिलीप रामकिसन काकडे यांच्या मालकीच्या शेती गट नंबर 69/2 मध्ये सुरू असलेल्या खाणीमधून आजपर्यंत 7800 ब्रास दगडाचे उत्खनन झाल्याचे आढळून आल्याचा पंचनामा व चौकशी अहवाल 24 रोजी तहसीलदारांना सादर केला होता.

सदर पंचनाम्यात नजीक चिंचोली येथील गट नंबर 69/2 पैकी शिरीष गंगाधर आरसुळे यांच्या नावावर असणारे 40 आर क्षेत्रामध्ये खोदकाम करून माका-शिरसगाव रस्त्यासाठी 325 फूट रुंद, 120 फूट लांब आणि 20 फूट खोल या आकाराचे क्षेत्रात एकूण 7800 ब्रास दगडाचे अनधिकृत उत्खनन केलेले असून दगड देशमुख अँड कंपनीच्या माका-शिरसगाव रस्त्यासाठी दिला असल्याचे मंडळाधिकरी यांनी नमूद केले आहे.

तसेच हे उत्खनन करताना कोणतीही परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही. सदरचे उत्खनन अनधिकृत केल्याचे दिसून येत आहे असेही नमूद केलेले आहे.

कुकाणा मंडलाधिकरी यांचा चौकशी अहवाल व पंचनमा यावरून नेवासा तहसीलदारांनी 26 डिसेंबर रोजी गट नंबर 69/2 चे जमीन मालक गिरीष गंगाधर आरसुळे रा. नजीक चिंचोली ता. नेवासा यांना खुलासा देण्याची व दंड भरण्याची नोटीस बजावली आहे.

या नोटीसीत म्हटले की, नजीक चिंचोली येथील गट नंबर 69/2 मध्ये समक्ष पहाणी केली असता संबंधित गटापैकी आपल्या नावावर असणारे 40 आर क्षेत्रामध्ये खोदकाम करून माका-शिरसगाव रस्त्यासाठी 325 फूट लांब, 120 फूट रुंद व 20 फूट उंचीचे 7800 ब्रास दगडाचे अनधिकृत उत्खनन केलेले आहे.

आपणाकडे उत्खनन परवानगी पास आहे किंवा कसे? याबाबत कागदपत्रांसह ही नोटीस मिळालेपासून 7 दिवसांच्या आत समक्ष हजर राहून खुलासा करावा.तो सादर न केल्यास व सादर केलेला खुलासा संयुक्तिक न वाटल्यास आपले विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) अन्वये 8 कोटी 11 लाख 20 हजार 125 रुपये दंड वसुलीची कारवाई करण्यात येईल.

तहसीलदारांनी जमीन मालक व ठेकेदार कंपनीला पाठीशी घालू नये ः गायके

नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली शिवारातील शेती गट नंबर 69/2 मध्ये दगड खाणीचे अनधिकृत उत्खनन करणे आणि त्यातील दगड खडी क्रेशरसाठी व रस्त्याच्या कामासाठी वापरणे ही बाब शासनाची फसवणूक करणारी आणि गौण खनिजाची चोरी करणारा प्रकार आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत असतानाही नेवासा तहसीलदार जमीन मालक आणि ठेकेदार कंपनीला फक्त खुलासा व दंड वसूल करण्याची नोटीस बजावत आहेत. तहसीलदारांनी दिघी शिवारातील गट नंबर 91/3 चा जमीन मालक, नजीक चिंचोलीतील गट नंबर 69/2 चे जमीन मालक व ठेकेदार देशमुख अँड कंपनी यांच्यावर 420 चा गुन्हा नोंदविण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या