Type to search

Featured नाशिक

उमराणे येथे पुरपाण्यासाठी कडकडीत बंद

Share

उमराणे | वार्ताहर

पूर्व भागातील तलाव भरून द्यावीत रामेश्वर ते झाडी कालव्याची रुंदी वाढवावी तसेच चणकापूर उजव्या कालव्याचे पूरपाणी सर्वप्रथम कुंभार्डे धरणात टाकावे या मागण्यासाठी उमराणे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

दरम्यान पूर्वभागात मागील दोन वर्षांपासून भीषण दुष्काळ असून यंदाही पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत असल्याने आज (दि. २५) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सर्व दुकाने, हॉटेल्स यांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेत प्रतिसाद दिला.
या बैठकीत पूर्व भागातील तलाव भरून द्यावीत, रामेश्वर ते झाडी कालव्याची रुंदी वाढवावी, चणकापूर उजव्या कालव्याचे पूरपाणी सर्वप्रथम कुंभार्डे धरणात टाकावे आदी मागण्यासाठी रविवारी उमराणे येथे बैठक झाली.

दरम्यान आंदोलनामुळे पाटबंधारे खाते खडबडून जागे झाले असून प्रथम टेलला पूरपाणी दिले पाहिजे ह्या नियमानुसार रामेश्वर धरण ते चिचंलवन बंधारा प्रयत्न अडथळे दूर करत गेट ओपन करीत चिंचवे धरण व कुंभार्डे धरणात पाणी सोडण्याचे नियोजन करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!