Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वेळुंजे : ब्राम्हणवाडे शिवारात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Share
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या; नगर तालुक्यातील घटना, Latest News Farmers Suicide Ahmednagar

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ब्राह्मणवाडे शिवारात एका अज्ञात तरूणाचे प्रेत माळरानावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अद्याप या तरुणाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान ब्राम्हणवाडे परिसरात आज दुपारच्या सुमारास अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळुन आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील अशोक गांगुर्डे यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस स्थानकात कळवले. त्र्यंबक पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर सदर मृतदेहाची तपासणी करून पंचनामा करण्यात आला.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास पो. स. नि रामचंद्र कर्पे व हवालदार लोखंडे व आहेर करीत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!