त्र्यंबकेश्वर : जलपरिषदेमार्फत हिरडी येथे जलसंवाद

त्र्यंबकेश्वर : जलपरिषदेमार्फत हिरडी येथे जलसंवाद

त्र्यंबकेश्वर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील हिरडी येथे जलपरिषदेच्या वतीने जलसंवाद साधण्यात आला. यावेळी ग्रामसेवक, सरपंच यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान प्रजसत्ताकदिनी ग्रामसभाही खेळीमेळीत पार पडली. यावेळी जलपरिषदटीमच्या माध्यमातून पाणी या विषयावर विशेष जलसंवाद ग्रामस्थांशी साधण्यात आला. यामध्ये पाणी पाण्याचे व्यवस्थापन यावर चर्चा करण्यात आली.

जलारिषदेचे राकेश दळवी यांनी ग्रामस्थांना पाण्याचे महत्व पटवून देत गेल्या काही वर्षांपासून आपल्या भागातील महिला ज्याप्रमाणे पाण्यासाठी दाहीदिशा फिरत असतात. यासाठी जलपरिषद उभी राहिली आहे. यातून सारंकाही पाण्य्साठी संकल्पनेवर आधारित चर्चा गावागावांत केली जाते.

ते यावेळी म्हणाले कि, जलव्यवस्थापनातील त्रुटींमुळे व जलसमस्येचे गांभीर्य नसल्यामुळे आज पाणी समस्या बिकट बनत चालली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत या समस्येवर उपाय शोधला पाहिजे. यानंतर ग्रामस्थांनी यावर एकमत होत जलपरिषदेला पाठिंबा दर्शविला आहे. या जलसंवादानंतर ग्रामसभाही पार पडली. यावेळी जलपरिषदेच्या टीमसह ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com