Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी शिर्डी वाहतूक शाखा सज्ज

Share
वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी शिर्डी वाहतूक शाखा सज्ज, Latest News Traffic Rules Implementation Shridi

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते त्यामुळे शहरात येणार्‍या भाविकांसाठी उद्भवणारे संभाव्य धोके विचारात घेता प्रवासी वाहनांची तपासणी तसेच नो पार्किंग झोन व रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येणार असून शहर वाहतूक शाखेकडून सर्व नागरिकांना वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणेबाबत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितींकुमार गोकावे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

शिर्डी शहर वाहतूक नियंत्रक शाखेकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक स्थळ असल्याने नियमितपणे शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे शिर्डी शहरात येणारे भाविक व श्रीसाईबाबा मंदिर यांना उद्भवणारे संभाव्य धोके विचारात घेता श्रीसाईबाबा मंदिर व भाविकांच्या सुरक्षेकडे प्रथम प्राधान्याने विशेष लक्ष देणे पोलीस प्रशासनास अत्यंत गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शिर्डी शहरात येणार्‍या जाणार्‍या प्रवासी वाहनांची तपासणी करणे तसेच नो पार्किंग झोन तथा रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.

त्या अनुषंगाने शिर्डी शहरात येणार्‍या व शहरातून जाणार्‍या वाहनांची व वाहनचालकांची तपासणी केली जाणार असल्याने शिर्डी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहन चालक तथा नागरिकांना खालील सूचनांची अंमलबजावणी करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक वाहनाचा अधिकृत क्रमांक वाहनांचे पाठीमागील व पुढील भागावर असणे बंधनकारक आहे. नंबरप्लेटवर इतर कोणतीही अक्षरे दादा, मामा, काका, भाऊ वगैरे लिहिलेला मजकूर नसावा. नंबरप्लेट फॅन्सी असता कामा नये. वाहन चालककडे वाहन चालवण्याचा परवाना व वाहनासोबत त्याची सर्व कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे.

परवाना नसलेल्या व्यक्तीस किंवा लहान मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये. दुचाकी वाहन ट्रिपलसिट चालवू नये. राँग साईडने वाहने चालवू नयेत. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये. वाहनचालकांनी वाहने रोडवर कोठेही पार्किंग करून निघून जाऊ नये. वाहन चालकांनी मद्यप्राशन करून वाहने चालवू नयेत. वाहनचालकांनी संबंधित विभागाची परवानगी घेतल्याशिवाय जाहिरात फलक वाहनांवर लावू नयेत. परिवहन अधिकारी यांचे पूर्वपरवानगीशिवाय वाहनचालक अथवा मालक यांनी वाहनात बदल करू नयेत.

सदरची कारवाई ही विशेष प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन परिसरात होत असलेल्या चैन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध करणे आणि प्राणांतिक अपघात रोखणे कामी सदरची कारवाई संयुक्तिक होणार असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे म्हटले आहे.

वाहने उडवायला आणि कर्ज बुडवायला दुचाकी वाहनांवर फायनान्स, बँक, पतसंस्था यांच्या थकबाकीमुळे वाहन जप्तीच्या धास्तीने अनेकांनी शक्कल लढवून मागील व पुढील नंबर प्लेट काढून टाकल्या आहेत. त्यामुळे या मिशनच्या माध्यमातून पकडण्यात येणार्‍या वाहनधारकांचे चेहरे समोर येतील. वाहनांच्या नंबर प्लेटवर दादा, मामा, भाऊ अशाप्रकारे लिहिलेला मजकूर आढळल्यास तसेच दुचाकी वाहनांचे अल्टरेशन केल्याचे दिसून आल्यास त्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार असून यामध्ये लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप न करता प्रशासनास सहकार्य करावे.
– नितीनकुमार गोकावे, पोलीस निरीक्षक,शिर्डी वाहतूक कक्ष

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!