Saturday, April 27, 2024
Homeनगरपुणतांबा: व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची अडवणूक

पुणतांबा: व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची अडवणूक

पुणतांबा (वार्ताहर)- परिसरात लॉकडाऊनच्या नावाखाली व्यापारी वर्गाकडून शेतकरी वर्गाची अडवणूक केली जात असल्यामुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या कांदा हरभरा गहू ही रब्बी पिके तयार करण्याची कामे वेगाने सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे मजूरांची टंचाई असताना ज्यादा मजूरी देऊन तसेच कुटूबांतील व्यक्तीच्या मदतीने पिके तयार केली जात आहे. साठवणूकीची व्यवस्था नसल्यामुळे तसेच आर्थिक विवंचना असल्यामुळे अनेक शेतकरी तयार झालेला शेतमाल तातडीने विकण्यास प्राधान्य देत आहे. मात्र येथील व्यापारी वर्ग सध्या तरी कवडीमोल भावाने मालाची खरेदी करत आहे.

- Advertisement -

व्यापार्‍याकडून सकाळी भाव विचारला असता एक व 12 वाजेनंतर भाव विचारले तर वेगळा भाव सांगितला जातो. त्यात वजन करून माल पोहच करावा पैसे आठ दिवसांनी दिले जातीत, अशी सबब सांगितली जाते. दोन दिवसापूर्वी हरभर्‍याचे भाव 4000 क्विंटलपर्यत होते. तर काल 3700 ते 3800 रुपये भाव खाली आले. कांद्याचे भाव तर 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत सांगितले जातात. त्यातही वजनात काही कपात केली जाते. शेतकरी वर्गाने विचारणा केली तर शेतमाल द्यावयाचा असेल तर द्या नाहीतर दुसरा व्यापारी बघा, असे उत्तर दिले जाते.

पुणतांबा येथे बाजार समितीची शाखा नाही. त्यामुळे खाजगी व्यापारी सध्या मनमानी करून मालाची अडवणूक करून खरेदी करत असल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या