राहाता – ट्रॅक्टर ओढ्यात पडून चालकाचा मृत्यू

jalgaon-digital
1 Min Read

एकरूखे (वार्ताहर) – राहता तालुक्यातील रांजणगाव खु. येथील ओढ्यात ट्रँक्टर पडून ड्रायव्हर भाऊसाहेब बापू पवार यांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहिती अशी, रांजणगाव खु. येथील भाऊसाहेब पवार शुक्रवारी शेतामध्ये नांगरणी करून शेतातून ट्रँक्टर घेऊन घराकडे जात असताना १७ फूट खोल असलेल्या ओढ्यामध्ये ट्रँक्टर पलटी झाला. त्यात पवार ट्रँक्टर खाली दाबले गेले. ट्रँक्टरचा मोठा आवाज झाल्याने आजू बाजूच्या परिसरातील लोकांनी धाव घेऊन पवार यांना शिर्डी येथील साईबाबा सूपर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *