Friday, April 26, 2024
Homeनगरगुटख्यानंतर आता तंबाखूवर बंदी

गुटख्यानंतर आता तंबाखूवर बंदी

कलेक्टरांचे आदेश । रस्त्यावर थुंकल्यास दंड

अहमदनगर (प्रतिनिधी) – दोन ‘गायछाप’वाले भेटले की मळ पुन्हा… असा डायलॉग नेहमीच कानी पडतो. या डायलॉगची कृती केल्यास तो आता गुन्हा ठरणार आहे. लॉकडाऊनच्या काळात नगरच्या कलेक्टरांनी गुटख्यानंतर आता तंबाखूबंदीचाही आदेश काढला आहे.

- Advertisement -

दारू, गुटखा आणि तंबाखू विक्रीवर बंदी असून त्याचे सक्तीने पालन करावे तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणी थुंकणार नाही याची काळजी प्रशासनातील जबाबदार विभागाने घ्यावी, असे आदेश कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी आज गुरूवारी काढले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड आकारणी करावी असेही आदेशात म्हटले आहे.

राज्यात 13 मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. केंद सरकारने कालच मार्गदर्शक सूचना काढत त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कलेक्टरांवर टाकली आहे. त्यानुसार कलेक्टरांनी आदेश काढत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई केली आहे. कलेक्टरांच्या या आदेशात तंबाखू, गुटखा व दारू विक्रीवर बंदी असल्याचे म्हटले आहे.

यातील तंबाखू व गुटखा विक्री अजूनही सुरूच असल्याचे चित्र आहे. तंबाखूची पुडी तर थेट 50 रुपयांना विकली जात आहे. विशेष म्हणजे खुलेआम विक्री थांबली असून आता फक्त ओळखीच्या व्यक्तीलाच चोरी-छुपके तंबाखू पुडी विक्री केली जात असल्याची प्रस्तूत प्रतिनिधीला दिसून आली.

सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे सक्तीचे
सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे
सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई
विवाह, अंत्यसंस्कारवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी

- Advertisment -

ताज्या बातम्या