Type to search

Featured maharashtra

अमित शाह आणि नरेंद्र मोदी समजण्यासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील: आशिष शेलार

Share

मुंबई | प्रतिनिधी

अमित शाह आणि नरेंद्र मोदी समजण्यासाठी संजय राऊत यांना बरेच जन्म घ्यावे लागतील असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना लगावला. तसेच ठाकरे आणि मोदींमध्ये विसंवाद निर्माण करण्यासाठी संजय राऊतच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मुंबईत भाजपची कार्यकारिणी बैठक सुरु आहे. त्यावेळी शेलारांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आशिष शेलार यांनी गेले काही दिवसांपासून रोज सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शेलार म्हणाले, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचा एकपात्री वगनाट्य रोज सकाळी आपण टीव्हीवर पाहत आहोत. संजय राऊत यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींचे बाळासाहेबांबरोबर खास नाते होते. हे नाते ते पंतप्रधान होण्याआधीपासूनचं होते. आता एक अदृश्य शक्ती मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू पाहत आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा पक्षाच्या निर्णयाबद्दल बोलतात तेव्हा एकाच सुरात बोलतात तेव्हा त्यांच्यात कुठलाही विसंवाद नसतो.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना समजण्यासाठी संजय राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. त्यातच संजय राऊत यांचा 15 नोव्हेंबर रोजी वाढदिवस असतानाच वयासोबत त्यांच्या विचारांची परिपक्वताही वाढावी, असाही टोमणा शेलार यांनी दिला. उद्यापासून आमचे सगळे आमदार आणि खासदार अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार असल्याच शेलार यांनी सांगितले.

पूर्वी मातोश्रीमधून राज ठाकरेंना भेटण्यासाठीही कुणी जात नव्हते. मात्र आता माणिकराव ठाकरेंना भेटण्यासाठी जाण्याची वेळ आली. तिन्ही पक्षांचे सुरु असलेले नाटक महाराष्ट्र पाहत आहे. सत्तेच्या हव्यासापोटी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी ओढ लागली आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेत्यांना मातोश्रीवर बोलवले जायचे आता यांनाच चर्चेसाठी बाहेर पडाव लागत आहे, असे म्हणत आशिष शेलार यांनी थेट उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!