Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

थोरात-विखे एकाच सोफ्यावर दोघांत गप्पाही रंगल्या

Share
थोरात-विखे एकाच सोफ्यावर दोघांत गप्पाही रंगल्या, Latest News Thorat-Vikhe Chat Sangmner

संगमनेर- संगमनेरमधील एका विवाह सोहळ्यानिमित्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील एकत्र आले होते. एकमेकांवर टीका करणार्‍या या दोन्ही नेत्यांनी विवाह सोहळ्यात एकाच सोफ्यावर बसत चर्चाही केली. राजकारणात वैरी असणारे समोर आलेतर मित्रत्वाच्या नात्याने भेटतात तसाच हा प्रसंग होता. हे पाहिल्यानंतर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

काँग्रेसमध्ये एकत्र असताना विखे आणि थोरात यांच्यामध्ये अनेकदा वैर पाहायला मिळाले. त्यांनतर विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकमेकांवर टीका करण्याची हे दोघे एकही संधी सोडत नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून ह्या दोन्ही नेत्यांत जोरदार शाब्दिक युध्द सुरू आहे. मात्र शनिवारी एका लग्नसमारंभात विखे-थोरात एकमेकांशेजारी बसलेले दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

विखे आणि थोरात चक्क एकमेकांच्या शेजारी एकाच सोफ्यावर बसले. तसेच एकमेकांशी हसतखेळत त्यांनी चर्चाही केली. मात्र, या दोघांमध्ये नेमक्या काय चर्चा झाल्या हे जाणून घेण्यास सर्वचण उत्सुक आहेत. मात्र याबबत बोलण्यास दोन्ही नेत्यांनी नकार दिला आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!