Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

थोरात कारखान्याच्या चेअरमनपदी ओहोळ, व्हा. चेअरमनपदी हासे बिनविरोध

Share
थोरात कारखान्याच्या चेअरमनपदी ओहोळ, व्हा. चेअरमनपदी हासे बिनविरोध, Latest News Thorat Sugar Factory Selection Ohol Hase Sangmner

संगमनेर (प्रतिनिधी)-  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकाराला दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी बाबा ओहोळ यांची तर व्हाईस चेअरमनपदी संतोष हासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

थोरात कारखान्याच्या अतिथीगृहामध्ये झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत कारखान्याचे मार्गदर्शक ना. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनर, मावळते अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, रामदास पाटील वाघ, सुरेश थोरात, अमित पंडित, शिवाजीराव थोरात, शंकरराव खेमनर, उद्योजक राजेश मालपाणी, इंद्रजितभाऊ थोरात, भाऊसाहेब कुटे, हरिभाऊ वर्पे, साहेबराव गडाख, संपतराव डोंगरे, अजय फटांगरे, उपसभापती नवनाथ अरगडे, जि. प. महिला बालकल्याण सभापती सौ. मीराताई शेटे, सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, विश्वास मुर्तडक, सुधाकर रोहम, रामहरी कातोरे, निर्मलाताई गुंजाळ, अर्चनाताई बालोडे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, विष्णुपंत रहाटळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. प्रताप (बाबा) पुंजाजी ओहोळ यांच्या नावाची सूचना रमेश लहानभाऊ गुंजाळ यांनी मांडली तर इंद्रजित अशोक खेमनर यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमनपदासाठी संतोष रखमा हासे यांच्या नावाची सूचना गणपत पुंजाजी सांगळे यांनी मांडली त्यास तुषार गणपत दिघे यांनी अनुमोदन दिले.

या बैठकीस नवनिर्वाचित संचालक इंद्रजितभाऊ थोरात, इंद्रजित खेमनर, चंद्रकांत कडलग, मीनानाथ वर्पे, भाऊसाहेब गीताराम शिंदे, संपतराव गोडगे, दादासाहेब कुटे, रोहिदास पवार, विनोद हासे, अनिल काळे, भास्कराव आरोटे, माणिक दाजिबा यादव, अभिजीत बाळासाहेब ढोले, मीराताई सुधाकर वर्पे, मंदाताई शेखर वाघ, तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार सातपुते आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आयोजित सत्कार समारंभात ना. थोरात म्हणाले की, थोरात कारखाना ही तालुक्यातील कामधेनू आहे. अ‍ॅड. माधवराव कानवडे व भाऊसाहेब कुटे यांनी मागील काळात अतिशय सक्षमपणे व योग्य पद्धतीने कारखाना चालविला, नव्या चेहर्‍यांना संधी देतांना बाबा ओहोळ व संतोष हासे यांची निवड केली आहे. संगमनेर तालुक्यातील कारखाना, दूध संघ, शेतकी संघ, शैक्षणिक संस्था यांसह सर्व सहकारी संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु आहे.

विधानसभा निवडणूकीत मी राज्यभर प्रचार करत असतांना आपण सर्व कार्यकर्त्यांनी मोठे काम केले. तालुक्यातील जनतेने कायम आपल्यावर प्रेम केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळाले. सलग 8 वेळा विधानसभेत जाण्याचा मान मिळाला. आता कारखानाही बिनविरोध झाला. सभासद व जनतेचे मोठे प्रेम या कारखान्यावर राहिले आहे. नव्या पदाधिकार्‍यांना आता हा समृद्ध वारसा पुढे चालवायचा आहे असेही ते म्हणाले. यावेळी मागील काळातील सर्व पदाधिकारी व अर्ज मागे घेतलेल्यांचे कौतुकही ना. थोरात यांनी केले.

आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या शिस्तीवर तालुक्यातील सहकार ना. थोरातांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. अ‍ॅड. माधवराव कानवडे व त्यांच्या सहकार्‍यांनी मागील काळात चांगले काम केले.हीच परंपरा नवीन पदाधिकारीही सांभाळतील असा विश्वास व्यक्त करतांना सहकारामुळेच तालुक्यात समृद्धी आली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

अ‍ॅड. माधवराव कानवडे म्हणाले की, ना. थोरात यांनी 15 वर्षे चेअरमनपदाची संधी दिली. आपण अतिशय प्रामाणिकपणे व पूर्ण कार्यक्षमतेने काम केले. नविन 5500 मेट्रिक टनाचा कारखाना उभारणीसह 30 मेगावॅट सहवीजनिर्मीती प्रकल्प व डिस्टिलरी प्रकल्प सुरु केला. कारखाना उत्तम आथिक स्थितीत असून कुणाचेही देणे बाकी नाही. कार्यक्षेत्रातील विकासात मोठे योगदान कारखान्याचे आहे. नवीन पदाधिकारी चांगले काम करुन कारखान्याचा आणखी गौरव वाढवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नूतन चेअरमन बाबा ओहोळ म्हणाले, ना. थोरात व शेतकरी विकास मंडळाने टाकलेला विश्वास आपण पूर्ण सचोटीने व प्रामाणिकपणे काम करून सार्थ ठरवू.

कार्यक्रमास कारखाना व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, सभासद, नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर तर सूत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले. आभार भाऊसाहेब कुटे यांनी मानले.

सर्वांचे अभिनंदन – ना. थोरात
थोरात कारखाना हा सहकारातील उत्कृष्ट कारखाना असून ऊस उत्पादक, शेतकरी, सभासद व नागरिकांचा मोठा विश्वास कारखान्यावर राहिला आहे. या कारखान्याच्या संचालक पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती. हे सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे आहेत; मात्र कारखान्याच्या व तालुक्याच्या हिताकरिता माघार घेतलेल्या सर्वांच यावेळी ना. बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!