Thursday, April 25, 2024
Homeनगरनाट्यगृहासाठी पाच कोटींचा निधी

नाट्यगृहासाठी पाच कोटींचा निधी

सतीश लोटके यांची माहिती । रंगकर्मींनी व्यक्त केले समाधान

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगरच्या नाट्य, सांस्कृतिक क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा असलेल्या नाट्यगृहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासाठी आघाडी सरकारकडे विशेष प्रयत्न करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने नियोजित नाट्यगृहास पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे रंगकर्मींमध्ये समाधानाचे वातावरण असून, सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असल्याची माहिती नाट्य परिषद मुंबईचे सहकार्यवाह सतीश लोटके यांनी दिली.

- Advertisement -

अहमदनगर हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही शहरातील नाट्यकर्मी यांना हक्काचे नाट्यगृह नव्हते. ही खंत आणि सल गेली अनेक वर्षे येथील कलाकारांच्या मनात होती. नाटय परिषदेच्या पदाधिकारी यांनी स्थानिक कलाकारांनी अनेक आंदोलने, निवेदने विविध स्तरावर पाठपुरावा केला होता. आता हा प्रश्न सुटणार आहे. आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे यांचे नाटय परिषदे अध्यक्ष अमोल खोले, सतीश शिगंटे, चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजान यांनी आभार मानले आहेत.

या नाट्यगृहासाठी नाट्यपरिषद, बालरंगभूमी परिषद, रंगकर्मी प्रतिष्ठान, सप्तरंग थिएटर, कलायात्रिक, नाट्य आराधना, हाउसफुल, जिल्हा हौशी नाट्य संघ, चेरिश थिएटर, मुखवटे, संघर्ष मंच, रंगसाधना, जिप्सी प्रतिष्ठान, रंगोदय, एकात्मता मंच, पुष्पक अकॅडमी, नाट्य मल्हार व नगरमधील रंगकर्मींनी मोठे योगदान दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या