Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सत्तास्थापनेचा सोशल वॉर; राजकीय संशयकल्लोळ ट्विटरवर ट्रेंड

Share

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेल्या भारतीय जनता पार्टीने राज्यात सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखविल्यानंतर काल (दि.10) सायंकाळी शिवसेनेला 24 तासांत सत्तास्थापनेचे निमंत्रण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून देण्यात आले. आज सकाळपासून संपर्काच्या सर्वात प्रभावी असलेल्या माध्यमांत म्हणजेच सोशल मीडियात आजच्या राजकीय नाट्याचे पडसाद प्रचंड उमटले.

सुरुवातीला शिवसेनाविथमहाराष्ट्र असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला होता. जवळपास 20 हजारपेक्षा अधिक ट्विट झाल्यामूळे हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आलेला दिसून आला. दरम्यान, शिवसेनेच्या विरोधी गटानेदेखील ट्विटरवर शहाला काटशह देत शिवसेनाचिटस्महाराष्ट्र असा हॅशटॅग वरती दिसून आला. दुपारी बैठकांचे नियोजन सुरु होते. सायंकाळीही बर्‍याच बैठका झाल्या.

दरम्यान, शिवसेना नेते थेट राज्यपालांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे पावणेसात वाजेच्या सुमारास कॉग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्यक्ष उघड पाठींब्याचे पत्र आले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील बाबींची प्रक्रिया पुर्ण न झाल्याने ते पत्र शिवसेनेकडे मिळाले नाहीत असे सांगण्यात आले.

यामध्ये सोनिया गांधींसह शरद पवार यांची तळ्यात मळ्यात भुमिका असल्यामूळे सेनेचा वेळ संपला त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. दरम्यान अनेक वर्षांनी ट्विटरवर मागे पडलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह महाराष्ट्र पॉलिटीक्स आणि शिवसेना चिटस् महाराष्ट्र हे हॅशटॅग रात्री दहा वाजले तरी ट्रेंडमध्ये दिसून आले. शिवसेनेने काँग्रेसची मदत मागितल्यामूळे शिवसेना चिटस् बाळासाहेब हा हॅशटॅगदेखील ट्रेंडमध्ये बराच काळ होता. शिवसेना आणि काँग्रेस या हॅशटॅगनेदेखील ट्रेंडमध्ये जागा घेतलेली दिसून आली.

सोशल मीडियातील निवडक पोस्टस्

हे आहेत खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक, गेली 15- 20 दिवस छातीत दुखत असताना देखील आपल्या पक्षा साठी स्वताच्या तब्यती कडे दुर्लक्ष करून फक्त आणी फक्त शिवसेने साठी लढले….लवकर बरे व्हा संजय राऊत.

पोपट करावा तर पवार साहेबांनीच.
वाघाचा सुद्धा पोपट करण्याची कला आहे त्यांच्याकडे.

सेना राष्ट्रवादीसोबत गेली तर हिंदुत्वासोबत गद्दारी
अन् भाजप गेली तर हिंदुत्वासाठी राष्ट्र उभारणीसाठी?
मंद भक्त लॉजीक!

मेहबुबा 3 वर्षासाठी मुख्यमंत्री चालली पण 25 वर्षे युतीत असलेल्या मित्रपक्षाचा मुख्यमंत्री अडीच वर्ष पण नको..वाह रे हिंदूत्व..

भाजपचा मुख्यमंत्री झाला तर बहुमताचा_आदर..
शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर बहुमताचा अवमान.
वा रे वा सत्तेचा_लालची…

बीजेपी करें तो रासलीला!
शिवसेना करें तो कॅरॅक्टर ढीला?

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!