Type to search

Breaking News Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

रिझर्व्ह बँकेने थांबवली दोन हजारांच्या नोटांची छपाई!

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली आहे. चालू आर्थिक वर्षा मध्ये आरबीआयने एकही नोट न  छापल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना आरबीआयने  ही माहिती दिली आहे.

काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांची नोट चलनातून बाद करत नवीन 2000 रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती.

यासर्व प्रकारावरून केंद्र सरकारवर आणि आरबीआयवर जोरदार टीकाही झाली होती. त्यानंतर 2000 रुपयांचे नोटेमुळे सुट्ट्यां पैशांची मोठी टंचाई निर्माण झाली होती. जास्त मूल्यांच्या नोटेमुळे पुन्हा काळा पैसा वाढण्यास देखील शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 2000 रुपयांच्या 354.29 कोटी नोटा छापल्या होत्या. तर 2017-18 मध्ये 11.15 कोटी नोटांची छपाई करण्यात आली होती. 2018-19 मध्ये 4.66 कोटी नोटांची छपाई करण्यात आली. तर चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या नोटा चलनात कमी प्रमाणात आल्या. 2018-19 मध्ये चलनातील 2000च्या नोटा 7.2 कोटींनी कमी झाल्या.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!