Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय

विधानसभा निवडणुकीचे चित्र वगेळे असेल शरद पवार: राष्ट्रवादी देणार नव्या चेहर्‍यांना संधी

Share

नाशिक । प्रतिनिधी

लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांत मोठा फरक आहे. यामुळे निवडणुकीचे चित्र वगेळे असेल. पक्ष सोडून गेलेल्यांचा राष्ट्रवादीवर काही परिणाम होणार नाही. राष्ट्रवादी आता नव्या चेहर्‍यांना, युवकांना अधिक संधी देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे नाशिक जिल्हा दौर्‍यावर आले असून.त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेऊन चर्चा केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, लोकसभेला मतदार हा संपुर्ण देशाच्या नेतृत्वाचा विचार करत असतो. आम्ही विरोधात असलो तरी आमची ताकद संपुर्ण देशात नाही. यामुळे नेतृत्वाचा दावा आम्ही करणे चुकीचे होते. परंतु विधानसभेला प्रश्न वेगळे असतात. स्थानिक प्रश्नांना लोक प्राधान्य देतात आणि त्यावरच निवडणुक जिंकली जाते. यामुळे विधानसभेत कॉग्रेस, राष्ट्रवादी पक्ष चांगल्या जांगा जिंकेल असा विश्वास आहे.

हे शासन शेतकरी विरोधी आहे. राज्यात 16 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु शासन यासाठी काही करताना दिसत नाही हे दुर्देव आहे. काही दिवसापुर्वीच केंद्र शासाने निर्यातमुल्य वाढविण्याचा निर्णय घेतला. बाहेरूण कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला याचे परिणाम जीरायत शेतकर्‍यांवर काय होतील हे ढुंकुण कोणी पाहत नाही. याचे सोयर सुतक कोणाला नाही. याचा राग येतो. हाच राग आता मला जनसामान्यांमध्ये दिसत आहे.

नोटा बंदी, जीएसटी या निर्णयांचे दुष्परिणाम आता दिसून येत आहेत. संपुर्ण देशात प्रचंड मंदी आहे. उद्योजकांनी नोकर कपात करण्याची धोरणे जाहिर केली आहे. युवकांना नोकर्‍या नाहीत.ज्यांना आहेत त्यांच्या जात आहेत. राज्यासह देशभरात सर्वस्तरांमध्ये शासना विरोधात प्रचंड नाराजगी असून ही मतदानातून बाहेर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

125/125 चा फार्म्युला
कॉग्रेस व राष्ट्रवादी 250 मधील प्रत्येकी 125 – 125 जागा लढवणार असून उर्वरीत 38 जागा या मित्र पक्षांना सोडण्यात येणार असल्याचे पवार यांनी पुन्हा स्पष्ट केले. यामध्ये शेकाप, जोगेंद्र कवाडे, शेतकरी संघटना, राजु शेट्टी आणि इतर डाव्या पक्षांना एकत्र घेऊन निवडणुक लढवणार आहोत. मनसेनेबाबत एकमत होऊ शकलेले नाही. तर वंचितने त्यांची भूमीका स्पष्ट केल्याने त्यांनी आघाडीत यावे न यावे बाबात आमच्या हातात काहीच नाही असे पवार यांनी सांगीतले.

राजेंना समजायला 15 वर्षे लागली
‘पक्षात अन्याय होत होता, असे सांगत उदयनराजे भाजपमध्ये गेले याबाबत पवार यांना पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले सत्तेत असताना राजांना याची जाणीव झाली नाही. आपल्यावर अन्याय होत आहे हे त्यांना आधी कळलं नाही का? अन्यायाची समज यायला त्यांना 15 वर्ष लागली?’ अशी कोपरखळी मारत पवारांनी हा विषय बाजुला सारला.

ठाकरेंची निवडणुकांवर बहिष्काराची भूमिका
मनेसेनेला आघाडीमध्ये घेण्याबाबत आपण बोलणी केली होती पंरतु त्यांच्या धोरणांबाबत आघाडीतील इतर पक्षांचे एकमत झाले नाही. ईव्हीएम मशीनवरील मतदानाबाबत राज ठाकरे यांनी रान पेटवले होते. परंतु सर्व पक्षीयांनी निवेदन देऊनही आयोगाने याबाबत काही निर्णय घेतला नाही. अखेरीस देशातील सर्व विरोधकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका त्यांनी मांडली. असे झाले तर विरोधक नामशेष होतील, जनता वार्‍यावर जाईल आणि देशात केवळ एकाधिकारशाही येईल. यामुळे त्यांची ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

तर निवडणुका फारच जवळ आल्यात
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राम मंदिराचा मुद्दा पुढे केला असून राममंदिर लवकरात लवकर उभे करावे अशी मागणी केल्याचे पवार यांना पत्रकारांनी सांगून त्यांची प्रतिक्रिया विचारली असता याचा अर्थ निवडणुका फारच जवळ आल्याचे त्यांनी सांगताच एकच हश्या पिकला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!