Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

पाच दहशतवाद्यांना अटक

Share
पाच दहशतवाद्यांना अटक, Latest News Terrorists Arrested Shrinagar

श्रीनगर – प्रजासत्ताक दिनाला म्हणजेच 26 जानेवारीला दहशतवादी हल्ल्याचा कट रचणार्‍या जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमधील हजरतबल भागातून या दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी 26 जानेवारीला श्रीनगरच्या आसपास आत्मघातकी किंवा आयईडी हल्ल्याचा कट आखला होता. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा काश्मीरमधील दोन ग्रेनेड हल्ल्यात सहभाग असल्याचेही समोर आले आहे. तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!