Type to search

Breaking News टेक्नोदूत मुख्य बातम्या

लॉकडाऊनमुळे भाऊ, ताईंच्या क्रिएटिव्हिटीला उधाण; फेसबुक झाले ‘चारोळीमय’

Share

नाशिक : सध्या लॉकडाऊनमुळे घरबसल्या नागरिक काहींना काही करण्यात व्यस्त आहे. यामध्ये तरुणाई देखील उतरली असून अवघ्या दोन दिवसांत फेसबुक चारोळीमय झाले आहे.

दरम्यान कोरोना व्हायरस च्या संकटाला रोखण्यासाठी मागील आठ दिवसांपासून लॉक डाऊन सुरु आहे. साहजिकच घरबसल्या रोज नवीन काय करायचे या प्रश्नाने सर्वांना हैराण केले आहे. कंटाळा आल्याने तरुण मंडळींनी आपला मोर्चा आता फेसबुककडे वळवला आहे. या मध्ये आपल्या फेसबुक फ्रेंड्स च्या जुन्या जुन्या फोटोना शोधून त्यावर कमेंट्स करण्याचा सुद्धा एक ट्रेंड सुरु झाला आहे.

या कमेंट्स सुद्धा काही सध्या सुध्या नसून अगदी मजेशीर यमक जुळवून तयार केलेल्या आहेत. मुलांच्या फोटोवर भाऊ आणि मुलीच्या फोटोवर ताई जोडून या कमेंट्स केल्या जात आहेत.

निवडक गमतीच्या कमेंट्स

शॉप आहेत बंद मिळतोय फक्त किराणा,                                                                                                                                भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराणा

एक कप चहा, एक प्लेट खारी,
भाऊच्या फोटोसाठी पोरी करतात मारामारी

ना दाढ़ी ना मिशा
तरी
भाउंच्या चर्चा दाही दिशा🤣🤣

डिंकाचा लाडू शेंगदाण्याची चिक्की
या फोटो समोर करीना कपूर फिक्की

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!