Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन की ऑफलाईन ?

Share
राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार लांबणीवर, Latest News Teacher Payment Turme Astgav

तीन मार्चला येणार अभ्यास गटाचा अहवाल

मुंबई – राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करायच्या की ऑफलाईन करायच्या यासंदर्भातला अभ्यास गटाचा अहवाल तीन मार्चला सादर होणार आहे. बदल्या कशाप्रकारे केल्या जाव्यात यासंदर्भात पाच सीईओंचा एक अभ्यासगट अभ्यास करून अहवाल तयार करत आहे. आता हा बदल्यांच्या नवा पॅटर्न कसा असेल याची शिक्षकांना उत्सुकता आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांवरून राज्यभर वादळ उठले आहे. या बदल्या ऑफलाईन करण्यासाठी सरकारमधील काही मंत्री आग्रही असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. थेट सरपंचपदाच्या निवडी प्रमाणे जनभावना लक्षात न घेता हा निर्णय देखील बदलला जाण्याची शक्यता आहे.

ऑनलाईनच्या अभ्यासासाठी शासनाने पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त केला आहे. मंगळवारी 25, फेब्रुवारीला राज्यातील शेवटची विभागनिहाय बैठक नागपूर आयुक्तालयात पार पडली. या बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि शिक्षक संघटनांची 99 टक्के मतं ही बदल्या ऑनलाईनच प्रक्रियेने व्हाव्या, या बाजूने व्यक्त झाली.

अभ्यास गटासमोर आलेले चर्चेचे मुद्दे
ऑनलाईन बदल्यांचे अधिकार जिल्हा स्तरावर असावेत का?
पती पत्नी एकत्रिकरणाचे अंतर हे तीस किमीवरून पन्नास कमी करावे का?
अवघड क्षेत्र पुनर्निर्मित करण्यात यावेत
बोगस प्रमाणपत्र सादर करून शिक्षकांच्या होणार्या बदलीसाठी कारवाईचा पॅटर्न असावा.
राज्यातल्या शिक्षक संघटनांची 99 टक्के मत ऑनलाईन बदल्या कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत .
बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्त करण्याला विरोध

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्त करण्याला विरोध केला आहे. संघटनांची बदल्या ऑनलाईनच व्हायला हव्यात अशी मागणी आहे. भाजप सरकारच्या काळातल्या निर्णयामुळे लाचखोरी थांबली होती. बदल्यासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्यात दुरुस्ती होऊ शकते. पण शिक्षकांच्या सर्व बदल्या ऑनलाईन हव्यात अशा मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी सरकारला दिले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!