Friday, April 26, 2024
Homeनगरशिक्षक, प्राध्यापकांसाठी ऑनलाईन लाईव्ह प्रशिक्षण

शिक्षक, प्राध्यापकांसाठी ऑनलाईन लाईव्ह प्रशिक्षण

शेवगाव (तालुका प्रतिनीधी)- कोरोना लॉकडाऊन काळात राज्यातील शिक्षक, प्राध्यापकांना हातातील मोबाईलचा वापर करीत उत्कृष्ट असे शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती करता यावी, यासाठी येथील तरूण इलेक्ट्रॉनिक्स अभियंता भुषण कुलकर्णी यांनी ऑनलाईन लाईव्ह मोफत प्रशिक्षण सुरू केले आहे. यु-ट्युब व फेसबुक लाईव्हच्या या प्रशिक्षणाला राज्यातून शिक्षक – प्राध्यपकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अभियंता कुलकर्णी यांनी त्यासाठी 15 दिवसांचे हे ऑनलाईन प्रशिक्षण डिझाईन केले आहे. त्यासाठी शेवगाव येथील राहत्या घरात फायबर ऑप्टिक हायस्पीड इंटरनेटचे कनेक्शन उपलब्ध करून त्या माध्यमातून बुधवार दिनांक 15 एप्रिलपासून लाईव्ह प्रशिक्षणाला सुरूवात केली आहे. रोज सकाळी 10 वाजता सुमारे एक ते दीड तास यु-ट्युब व फेसबुकवर लाईव्ह प्रशिक्षण सुरू राहणार आहे. नगर येथून एकनाथ कोरे हे प्रशिक्षणात मार्गदर्शन करीत आहेत. गेल्या दोन दिवसांत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच कनिष्ठ व महाविद्यालयीन प्राध्यापकांनी दररोज सुमारे 4 ते 5 हजार शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

- Advertisement -

या प्रशिक्षणात विविध उपयोगी अ‍ॅप्सचा वापर, ऑनलाईन टेस्ट, मोबाईलच्या मदतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग, उत्कृष्ट शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, बेसिक पासून ते अ‍ॅडव्हान्स अशा विविध तांत्रिक गोष्टींचा समावेश केला आहे. गणित – विज्ञान या अवघड विषयांसह सर्व विषयांत अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती करण्यासाठी शिक्षक – प्राध्यापकांना याचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे यु-ट्युब व फेसबुकवर ऑनलाईन प्रशिक्षणा बरोबर ते ऑफलाईनही उपलब्ध आहे.

http://www.youtube.com/mahabridge/live या यु-ट्युब तसेच http://www.facebook.com/mahabrigefbया फेसबुकच्या लिंकवर जाऊन शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभियंता कुलकर्णी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या