Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिक्षकांचे पान आणण्यासाठी विद्यार्थी पानटपरीवर

Share

खरवंडी कासार (वार्ताहर)- सरकार एकिकडे विद्यार्थ्यांना वैश्विक शिक्षण देण्यासाठी शिक्षणात आमुलाग्र बदल करत आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचे करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वाड्या वस्त्यांपर्यंत शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. परंतु कोरडगाव जि. प.प्राथमिक शाळेत शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या नियमाला तिलांजली देत विद्यार्थ्यांनाच आपले नोकर समजत पान, मावा, सुपारी खाण्यासाठी विद्यार्थ्यांना पानटपरीवर पाठवत शिक्षण विभागाची थट्टा उडवली आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी घटनेचा निषेध करत बेशिस्त शिक्षकांवर कारवाईची मागणी गटशिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

विद्यार्थ्यांना जि.प. शाळेत शिक्षणाचे धडे मिळावेत या उद्देशाने ग्रामीण भागात वस्तीशाळा, साखरशाळा, सेमी इंग्रजी शाळा, ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शाळा वसतिगृह सुरु करत आहे परंतु दुर्गम व अतीदुर्गम तांडा वस्ती प्राथमिक शाळेत शिक्षक अध्यापनाकडे दुर्लक्ष करून अशिक्षीत शेतकरी वर्गातील मुलांना शिक्षणाचे धडे देण्याऐवजी मुलांना आपल्या हौसेपायी विविध काम सांगून नोकरासारसारखे काम करून घेतात.

यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाश्वत व वैश्विक शिक्षण देण्याच्या परंपरेला काही शिक्षक खो देत असून यामुळे कृतीशील व उपक्रमशिल शिक्षकांना याचा फटका बसत आहे. बेजबाबदार शिक्षकांना तात्काळ निलंबीत करून विद्यार्थ्यांचे शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पाथर्डी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

विद्यार्थ्यांना पानटपरीवर द्रावक पदार्थ आणण्यासाठी पाठवणे हा गुन्हा आहे वरीष्ठांकडे अहवाल पाठवला असुन कायदेशीर कारवाई केली जाईल
-शिवाजी कराड, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पाथर्डी

विद्यार्थ्यांना दुपारी पानटपरीवर पाहिल्याने त्यांना विचारपूस केली असता त्यांनी शिक्षकांनी पान आणण्यासाठी पाठवले असल्याचेे सांगितले. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिक्षकांच्या बेशिस्त व बेजबाबदार वागणुकीचे पडसाद उमटले आहेत.यावर त्वरित कारवाई व्हावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल.
-हरिभाऊ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य कोरडगाव

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!