Thursday, April 25, 2024
Homeनगरतहसीलदारांनी सर्व सुविधा देत आठ परप्रांतियांना केले होम क्वारंनटाइन

तहसीलदारांनी सर्व सुविधा देत आठ परप्रांतियांना केले होम क्वारंनटाइन

झारखंडच्या मजुरांना मातापूरच्या दोंड वस्तीवर दिल्या सर्व सुविधा; प्रशासनाच्या कामकाजाचे कौतुक

भोकर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर (दोंड वस्ती) येथे झारखंड येथून पाईपलाईनच्या कामासाठी आलेल्या मजुरांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनने आपल्या राज्यात जावू न शकलेल्या आठ मजुरांची गावचे सरपंचासह तहसिलदार प्रशांत पाटील यांनी समक्ष भेट घेतली. या नागरिकांना तुमची सर्व काही व्यवस्था केली जाईल परंतु लॉकडाऊन संपेपर्यंत कुठेही न जाण्याचे सांगितल्याने या मजुरांना न्याय व निवारा मिळाल्याने प्रशासनाच्या कामाचे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातून जात असलेल्या सरकारी पेट्रोल वाहक पाईप लाईनच्या कामासाठी झारखंड येथील मजूर आलेले आहेत. मात्र सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. तसेच संबंधित ठेकेदाराने पैसे न दिल्याने या मजुरांना आपल्या राज्यात जाणे शक्य नव्हते. निपाणी वाडगाव, अशोकनगर शिवारातील दोंडवस्ती परिसरात काम करत असलेल्या या मजुरांना कुठलाही ठिकाणा राहिला नव्हता, अन्नपाणी ही संपले होते. ठेकेदर फोन उचलत नव्हता, अशा परिस्थीतीत काही दिवस मातापूरचे सरपंच आशिष दोंड, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी दोंड व रावसाहेब दोंड यांनी त्यांच्या जेवणाची सोय केली.

चार दिवसानंतर हा विषय उपविभागीय अधिकारी अनिल पवार, पोलीस उपधिक्षक राहुल मदने, तहसिलदार प्रशांत पाटील व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांना समजताच त्यांनी याठिकाणी भेट देत या परप्रांतीय मजुरांशी चर्चा करून त्यांना निपाणी वाडगावच्या दोंड वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्या उघडून देत सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे.

तसेच त्यांना होम क्वारंटाइनचे शिक्के मारून निर्धारीत मुदत संपेपर्यंत सदरचे ठिकाण न सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. श्यामसुंदर आदव, सिताराम जी आदव, बसंत भिकन मातव, राहुल मोहन मातव, राजुदास बुधदास, जितेंद्रनाथ गोस्वामी, सोनेजकुमार गोस्वामी व विजय गोस्वामी अशी या मजुरांची नावे आहेत. आता या मजुरांची देखभाल मातापूरचे सरपंच आशिष दोंड, भाजपाचे तालुका उपप्रमुख शिवाजी दोंड हे करत असून त्यांना रावसाहेब दोंड, पप्पू दोंड, करण दोंड, बंटी दोंड, ऋषिकेश रणछोड आदी सहकार्य करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या