Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

काळ्याबाजार चाललेले धान्य तहसीलदारांनी पकडले

Share
काळ्याबाजार चाललेले धान्य तहसीलदारांनी पकडले Latest News Tahasil Group Raid On Black Market Ahmednagar

बोल्हेगाव येथील दुकानचालकाचा कारभार : सील करण्याचे आदेश

अहमदनगर (वार्ताहर) – नगर तहसीलच्या पथकाने बुधवारी (दि 8) रात्री साडेआठच्या दरम्यान बोल्हेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून काळ्या बाजारात जाणारा धान्याच्या ट्रॅक्टर पकडला.

बोल्हेगाव येथील गोपाळ कृष्ण कळमकर यांच्या स्वस्त धान्य दुकानातून प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेले धान्य अवैधपणे गोण्यांमध्ये भरून ट्रॅक्टरने काळ्या बाजारात घेऊन जात असल्याची माहिती नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांना मिळाली. या घटनेची तहसीलदार पाटील यांनी गावातील काही नागरिकांशी संपर्क करून खात्री करून घेतली. माहितीमध्ये तथ्य असल्याची खात्री झाली असता तहसीलदार पाटील यांनी नागापूरचे मंडळ अधिकारी श्रीनिवास आव्हाड यांच्या पथकास बोल्हेगाव येथे तातडीने जाण्यास सांगितले.

त्याचबरोबर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे यांनासुद्धा तात्काळ मदत पाठविण्यास सांगितली. तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुलानी यांनाही ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला आणण्याबाबत सुचित केले. या घटनेची अन्नधान्य वितरण अधिकारी पवार यांनी फिर्याद नोंदवली असून मंडस अधिकार्‍यांनी धान्य दुकानाला सील करण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या पूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जीवनावश्यक वस्तूबाबत प्रत्येक नागरिक चिंतेत आहे. नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुकर होणे कामी स्वस्त धान्य दुकानदारांनी नियमांना अनुसरून धान्य वाटप करणे आवश्यक आहे. याबाबत जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परिपत्रकाद्वारे सर्व दुकानदारांना कडक सूचना देऊनही काही दुकानदार माणुसकीला काळीमा फासण्याचे कृत्य करत असल्याच्या तक्रारी होत्या. बोल्हेगाव येथील प्रकारामुळे या तक्रारींवर शिक्कामोर्तब झाले आहे.

दोन दिवसापूर्वीच चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तू विकणार्‍या दुकानदारांना नोटिसा काढून नगर तहसीलने खुलासा मागविला आहे. तसेच किमतीपेक्षा जास्तीची रक्कम घेऊन गॅस सिलेंडर विकणार्‍या गॅस एजन्सीवर कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे. त्याच दरम्यान बोल्हेगावची घटना घडली आहे. कायदा मोडणार्‍यांना शासन करून कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तू नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी मेहनत घेत आहेत. एकीकडे प्रशासन मेहनत घेत असताना दुसरीकडे मात्र स्वस्त धान्य दुकानचालकांकडून लूट करण्याचे प्रकार होत असल्याचे याघटनेमुळे उघडकीस आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!