Tuesday, April 23, 2024
Homeनगरतबलिगीच्या 26 विदेशींना न्यायालयीन कोठडी

तबलिगीच्या 26 विदेशींना न्यायालयीन कोठडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- तबलिगी जमातीच्या दिल्ली येथील मरकजच्या कार्यक्रमानंतर नगरमध्ये दाखल झालेल्या 26 परदेशी व तीन भारतीय अशा 29 नागरिकांना स्थानिक गुन्हे शाखेने 17 एप्रिलच्या रात्री अटक केली होती. यातील 26 परदेशी नागरिकांना 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची मुदत संपल्याने न्यायालयाने या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तिघा भारतीयांना यापूर्वीच न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. दरम्यान, परदेशी नागरिकांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर शनिवारी (दि. 25) सुनावणी होणार आहे. करोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत हे सर्वजण पर्यटन व्हिसा घेऊन भारतामध्ये दाखल झाले. दिल्ली येथील मरकजच्या कार्यक्रमानंतर त्यांनी नगरमध्ये वास्तव्य केले. पर्यटन व्हिसा असताना या सर्वांनी धर्मप्रसार केला, तसेच जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध जिल्ह्यातील भिंगार, जामखेड, नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन असलेल्या 26 परदेशी व तीन भारतीय अशा 29 नागरिकांना त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्याने अटक करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या