Type to search

Featured नाशिक

स्वदेश फाऊंडेशनकडून आदिवासी गावे दत्तक

Share

नाशिक । प्रतिनिधी

स्वदेश फाऊंडेशनने जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यांतील गावे दत्तक घेतली असून तेथे विकासकामे केली जाणार आहेत. पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या चार आदिवासी तालुक्यांतील गावांचा त्यात समावेश आहे. स्वदेश फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेत इगतपुरीतील काही गावांची पाहणी करून तेथे काय उपाययोजना करावायच्या आहेत याचीही माहिती घेतली.

रायगड जिल्ह्यात स्वदेश फाऊंडेशन मागील वीस वर्षांपासून गावे स्वयंपूर्ण करण्यासाठी काम करत आहे. फाऊंडेशनने आता एक हजार गावे आदर्श करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांतील काही गावे निवडली आहेत. त्यासाठी प्रथम या तालुक्यांतील कुठल्या गावांमध्ये कुठल्या आदर्श योजना सुरू आहेत, कुठल्याही इतर योजना सुरू असल्यास त्यांचा उपयोग त्या योग्य की अयोग्य अशी सर्वच तपासणी फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी केली.

प्राथमिक शाळा, पीएचसी सेंटर, आरोग्य केंद्र, पाणी वितरणाची व्यवस्था, शौचालयांची स्थिती एकूणच सर्वच बाबींची पाहणी केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक झाली. त्यात सद्यस्थितीत जिल्ह्यातील गावांमध्ये शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि उपजीविकेसाठी सुरू असलेले उपक्रम, आवश्यक व नव्याने स्वदेश फाऊंडेशनच्या मदतीने सुरू करण्यात येणारे उपक्रम यांची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, स्वच्छता तसेच कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या वतीने प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादरीकरण केले. त्यानंतर इगतपुरीतील गावांची पाहणी करून आणि इगतपुरी पंचायत समिती येथे अधिकार्‍यांची बैठक घेतली.

या गावांची पाहणी
इगतपुरीतील मुंडेगावचे सेंट्रल किचन, काळुस्ते येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळा, पिंपळगाव मोर येथील अंगणवाडी व ग्रामस्थांशी चर्चा केली. चिंचलेखैरे गावालाही भेट देत पाहणी केली.

जिल्ह्यातील आदिवासी भागातील काही गावांंच्या विकासाठी स्वदेश फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यांच्यासोबत बैठक पार पडली. इगतपुरीतील काही गावांची त्यांनी पाहणी केली.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!