Thursday, April 25, 2024
Homeनगरथेट सरपंच निवडीचा जोर्वे ग्रामपंचायतीचा ठराव हा राजकीय खोडसाळपणा – थोरात

थेट सरपंच निवडीचा जोर्वे ग्रामपंचायतीचा ठराव हा राजकीय खोडसाळपणा – थोरात

संगमनेर (प्रतिनिधी)- थेट सरपंच निवडीचा निर्णय परत ठेवावा हा जोर्वे ग्रामपंचायतीचा ठराव काही मूठभर लोकांनी फक्त राजकीय द्वेषातून व प्रसिद्धीसाठी केलेला स्टंटबाजीचा प्रकार असून राजकीय खोडसाळपणा आहे. त्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते सुरेश थोरात यांनी केली आहे.

जोर्वे ग्रामपंचायतने केलेल्या कथित ठरावाबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सुरेश थोरात व जोर्वे गावचे सरपंच रवींद्र खैरे यांनी म्हटले आहे, जोर्वे गावाचे सरपंचपद हे काँग्रेस प्रणीत रवींद्र खैरे यांच्याकडे आहे. त्याचबरोबर अनेक सदस्यही ना. बाळासाहेब थोरात व काँग्रेसच्या विचाराचे आहेत. गावातील जनता ही काँग्रेसच्या विचारांची असून कायम ना. बाळासाहेब थोरात यांच्याच पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. मात्र काही राजकीय शक्तीच्या माध्यमातून जोर्वेमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होत आहे.

- Advertisement -

त्यांना ना. थोरात यांचे राज्यातील वाढलेले महत्त्व पाहवत नाही. गावातील काही मुठभर लोक विकास कामांमध्ये सातत्याने आडकाठी करत आहे. गावातील जनता ही त्यांना महत्व देत नाही. म्हणून स्वत:चे महत्व व प्रसिध्दी वाढविण्याकामी विरोधक व त्यांचे समर्थक असे खोडसाळ उद्योग करत आहेत. याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकारने प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला अधिक महत्त्व देत लोकशाही अधिकाधिक मजबूत करण्यासाठी घेतलेला हा दूरदृष्टीचा निर्णय आहे.

या निर्णयाचे संपूर्ण राज्यातून स्वागत होत आहे. मात्र जोर्वेतील काही तथाकथित पुढार्‍यांनी फक्त प्रसिद्धी व्हावी व राजकीय खोडसाळपणा हे कृत्य असून त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही असे सुरेश थोरात यांनी म्हटले आहे. यावर सरपंच रवींद्र खैरे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य श्रीपाद राजेंद्र थोरात, दीपक वारे, सौ. इंगळे यांसह गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या