Friday, April 26, 2024
Homeनगरसुपा : वनविभागाचे पाणवठे कोरडे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

सुपा : वनविभागाचे पाणवठे कोरडे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

सुपा (वार्ताहार) – वन विभागाणी जागोजागी ऊभारलेले पाणवठे फक्त  दिसावू आसुन त्यात पाणी नसल्याने वन्यप्राण्याना  पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. मे  महीन्याची सुरवात झाली म्हणजे उन्हाळा सर्वोच्च बिंदू वर आहे. आज रोजी सुपा परीसरात सुर्य ३८ ते ४० आंश तापमानाने आग ओकत आहे. माणसाणा पाणी टचाईच्या झळाया जाणवू लागाल्या आहेत. पाळीव प्राणी संभाळने आवघड झाले. ते वन्य प्राण्याना कोणी वाली नाही. सुपा पंचक्रोशित सुपा शहाजापुर, जातेगाव, राळेगण सिद्धी,  नारायणगव्हा, या ठिकाणी  वन विभागाने पाणवठे उभारले आहेत.

परंतु  नेहमीची येतो पावसाळा या उक्ती प्रमाणे प्रत्येक उन्हाळ्यात प्राणाना पाण्यासाठी वन वन भटकावे लागते. वन्य प्राणी या भयंकर उन्हाळ्यात पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे धाव घेतात त्यात ते पाळीव कुञाना सापडतात नाहीतर रात्रीचे  विहिरीत पडतात. यात नेहमीच  वन्य प्राण्याचे जीव जातात , तर कधी पाणी शोधताना रस्ता  ओलाडताना वहानाच्या धडकेणे कितीतरी प्राण्यानी आपला जीव गमवला आहे . तर कधी प्राणी पाणी शोधताना शेततळ्यात फसतात किवा मग शेतकर्याचे मोठे नुकसान करतात.तेव्हा वन विभागानी जंगलातील पाणवठ्यानी पाणी सोडावे अशी मागणी  प्राणी प्रेमी व परीसरातील शेतकरी करत आहे . आज रोजी वन ! विभागात  ससे  हरीण  कोल्हे लांडगे खोकड या प्राण्यांची पाण्यासाठी खुप वनवन आहे.

- Advertisement -

जंगलानी मोराची संख्या खुप आहे त्यानाही पाण्याच्या  शोधार्थ कधी कधी मानवी वस्तीच्या आसपास जावे लागते परंतु तेथे जाणे कधी कधी त्याच्या जीवावर बेतते . कारण कुञ्याच्या हाल्यात मोर हा प्राणी  सापडतोच .कोरोना व्हायरसने सर्व काही बंद आसल्याने जेथे माणसाच्या आण्ण  पाण्याच्या प्रश्न उभा राहिला आहे तेथे वन्य प्राण्याचा विचार कोण करणार . महीनाभरावर पावसाळा आला आहे दोन तीन वेळा पाणी सोडले तरी महीनाभरात पाऊस पडल्यावर त्याचे मार्गी लागेल.

तेव्हा वन विभागणी सर्वच पाणवठ्यानी पाणी सोडवून या मुक्या जीवाची तृष्या भागवावी अशे मागणी नागरिक करत आहे. जर दोन दिवसात या पाणवठ्यानी पाणी नाही  सोडले तर ही समन्या आमदार निलेंश लंके याच्या कानावर घातली जाईल अशे सुपा शहाजापुर येथील नागरीकानी दैनिक सार्वमतशी बोलताना सांगितले.
- Advertisment -

ताज्या बातम्या