Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सुपा टोलनाक्यावर गुन्हेगाराची पोलिसाशी झटापट; आरोपी फरार

Share
केडगावात टायरचे दुकान फोडले; साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास, Latest News Kedgav Tire Shop Thife Ahmednagar

सुपा (वार्ताहर)- अहमदनगर पुणे महामार्गावर सुपा टोलनाक्यावर ड्युटीवर आसलेल्या पोलीस कर्मचार्‍याबरोबर फरार आरोपीची झटापट झाली असून आरोपी पळून गेले.

पोलीस कर्मचारी प्रमोद मधुकर लहारे वय 29 नियुक्ती कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी रात्री काही आरोपींच्या शोधार्थ त्याच्या मोबाईल लोकेशनवरून गाड्यांची तपासणी करत असताना रात्री 10.25 वा. विना नंबरची नॅकसॉन कंपनीची राखाडी रंगाची चारचाकी गाडी पोलिसांनी थांबवली. त्यातील आरोपी विश्वजीत रमेश कासार रा. वाळकी, ता.नगर याच्या मोबाईल लोकेशनवरून टोलनाक्यावर थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने गाडी थांबवून बाहेर न येताच थोडी काच खाली करत आतुनच दमदाटी करत शिवीगाळ केली.

त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पो. ना. शेख यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने गाडीच्या खाली न येताच ड्रायव्हर शीटवर बसून पोलीस कर्मचार्‍याच्या हातावर व तोंडावर मारहाण करून गाडी रिव्हस मारून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेला. कर्तव्य बजावत असताना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून फिर्यादी लहारे यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 353, 332, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विश्वजीत रमेश कासार याचा शोध घेतला जात आहे. सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रांजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!