Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सुंदरनारायण मंदिराचा एक चिरा चाळीस हजारांचा; गतवैभव होणार प्राप्त

Share

नाशिक । दि. 11 प्रतिनिधी
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या सुंदरनारायण मंदिराच्या जीर्णोद्वाराचे काम सुरू असून त्यासाठी नांदेड येथील खाणीतील चिरे मागवण्यात आले आहेत. एका चिर्‍याची किंमत चार हजार रुपये इतकी आहे. या कातळावर कलाकत्मक व सुबक कोरीव काम केले जात आहे. तामिळनाडू येथील कारागिर पाषाणावर नक्षीकाम करत आहेत. एका चिर्‍यावर कोरीव कामाचा खर्च चाळीस हजार इतका येत आहे.

सन 1756 मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत या मंदिराची वेळोवेळी डागडुजी करण्यात आली होती. मात्र अडीच वर्षे झाल्याने मंदिराचे बांधकाम जीर्ण झाले आहे. मंदिरासाठी वापरण्यात आलेला पाषाण ठिसूळ झाला होता. मंदिराच्या मूळ बांधकामाला धोका निर्माण झाला होता. या मंदिराची देखभाल पुरातत्त्व विभाग करतो. विभागाकडून दीड वर्षापूर्वी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले.

त्यासाठी शासनाने 14 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी चार कोटी निधी मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी प्राप्त झाला आहे. मंदिराच्या बांधकामासाठी नांदेड येथील खाणीतील बेसाल्ट खडक वापरला जात आहे. जवळपास 520 चिर्‍यांवर कोरीव काम सुरू आहे. या प्रत्येक चिर्‍याची किंमत चार हजार रुपये इतकी आहे. चिर्‍यांवर सुबक नक्षीकाम करण्यासाठी तामिळनाडू राज्यातून कारागिर बोलावण्यात आले आहेत.

चिर्‍यांवर नक्षीकाम करण्यासाठी साधारत: 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. खाणीतून चिरे आणूण त्यावर नक्षीकाम करण्याचा खर्च चाळीस हजार रुपये इतका आहे. मंदिराच्या बांधकामासाठी अजून 1200 चिरे लागणार आहेत. मंदिराचे जीर्ण झालेले पाषाण काढून त्या ठिकाणी नवे चिरे बसवण्यात येणार आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यावर पूर्वीप्रमाणे मंदिराला गतवैभव प्राप्त होणार आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास अद्याप दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे.

त्यावेळी दहा लाख खर्च

सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी हे मंदिर बांधले. त्यावेळी त्यासाठी दहा लाख रुपये खर्च आला होता. संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेल्या मंदिरासाठी चुना, शिसे, नवसागर आदींचा वापर करून चिरेबंदी करण्यात आली.

मशीनने नक्षीकाम

चिर्‍यांवर नक्षीकाम करण्यासाठी मशीनचा उपयोग केला जात आहे. हाताने नक्षीकाम करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागायचा. मशीनमुळे हा कालावधी दहा ते पंधरा दिवसांवर आला आहे. मात्र मशीनने काम करताना उडणार्‍या धुळीमुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!