Friday, April 26, 2024
Homeनगर‘मुळा’चे आवर्तन शुक्रवारी सुटणार

‘मुळा’चे आवर्तन शुक्रवारी सुटणार

कार्यकारी अभियंत्यांचे पत्रक

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – मुळा धरणाच्या उजव्या कालव्याचे आवर्तन नियोजित वेळेच्या पाच दिवस आधीच सोडण्याचा निर्णय पालकमंत्र्यांच्या आदेशाने घेण्यात आला असून हे आवर्तन 20 एप्रिल रोजी सोडले जाणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.

- Advertisement -

श्री. देशमुख यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात म्हटले की, पालकमंत्री हसन मुश्रीम यांचे अध्यक्षतेखाली 20 जानेवारी रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उन्हाळी हंगामातील आवर्तनाचे नियोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे 22 जानेवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान 29 दिवसांचे रब्बीचे आवर्तन पार पडले.

मुळा उजव्या कालव्याच्या मागील आवर्तनात काही ठिकाणी भराव खचला आहे. मागील आवर्तनापूर्वी काम करुनही पुन्हा भराव खचले आहेत त्या ठिकाणची माती वाळूमिश्रित असल्याने असे प्रकार वारंवार होतात. अशा ठिकाणी भरावाची कामे सुरु आहेत. कालवा फुटीचा धोका होऊ नये म्हणून उन्हाळी आवर्तनापूर्वी ही कामे करणे गरजेचे आहे. तसेच कालव्यावरील विमोचकांच्या द्वारांच्या दुरुस्तीची कामेही सुरु असून ही सर्व कामे 19 मार्च पर्यंत पूर्ण होतील.

पालकमंत्री यांचेसोबत तसेच कार्यक्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी यांचेसोबत या संदर्भात चर्चा झाली असून पालकमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार नियोजित उन्हाळी आवर्तन 25 मार्च ऐवजी 20 मार्च रोजी सोडण्यात येईल.

अनधिकृत उपसा करणार्‍यांवर कठोर कारवाई
कमीत कमी पाण्यात हे आवर्तन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. या आवर्तनात ओढे, नाले, गावतळी भरण्यात येणार नाहीत. तसेच अनधिकृत पाणी उपसा तसेच कालव्यांचे नुकसान करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या