Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर : दत्तनगर पोलीस चौकीसमोरच तरुणाने घेतले पेटवून

श्रीरामपूर : दत्तनगर पोलीस चौकीसमोरच तरुणाने घेतले पेटवून

पोलीस कर्मचार्‍याच्या जाचास कंटाळून उचलले टोकाचे पाऊल! नातलगांचा आरोप

टिळकनगर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील नदीम पठाण या विवाहित तरुणाने दत्तनगर येथील पोलीस चौकीच्या समोर अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना काल दुपारच्या सुमारास घडली. नदीम गंभीर भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. टिळकनगर पोलीस चौकीच्या एका पोलीस कर्मचार्‍यासोबत चालू असलेल्या वादामुळे नदीमने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

नदीम पठाणच्या नातलगासह मित्रमंडळानी दिलेल्या माहितीनुसार काल रमजान सण असल्याने नदीमने आपल्या घरी ईदची नमाज पठण केली. घरी काही वेळाने नदीम आपल्या मित्रांसोबत दत्तनगर एमआयडीसी येथील एका फेब्रिकेटरच्या दुकानात बसला असता तेथून येथील चौकीच्या एका पोलीस कर्मचार्‍यांसोबत काही कारणांहून दूरध्वनीवरून खटका उडाला व तुमच्यामुळे माझा मानसिक छळ होत आहे.

तुमच्या जाचास मी कंटाळलो असल्याचे नदीम त्याला म्हणाला. त्यानंतर श्रीरामपूर शहरच्या पोलीस अधिकार्‍यांनाही नदीमने दूरध्वनीवरून याबद्दल माहिती दिली. असता तू मला समक्ष भेट असे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही वेळातच काही मित्रांसोबत नदीम दुचाकीवरून एमआयडीसी येथून निघाला व दत्तनगर येथील पोलीस चौकी समोर येताच दुचाकीच्या मागे बसलेल्या नदीम चौकीसमोर थांबला. चौकीसमोर उभे राहून बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले.

घडलेला प्रकार स्थानिक नागरिक, पोलीस चौकीतील कर्मचारी आणि मित्रांच्या लक्षात येताच नदीमच्या दिशेने अनेकांनी धाव घेत आग विजविली व तात्काळ लोणी येथील रुग्णालयात दाखल केले. आग विझविण्यासाठी आलेल्या काही पोलीस कर्मचार्‍यांनी घाईघाईने नदीम यांचा मोबाईल काढून घेतल्याने प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

दरम्यानच्या काळात गेल्या एक ते दीड वर्षांपासून नदीमचे आपल्या पत्नी सोबत भांडण चालू होते. नदीमची पत्नी आपल्या माहेरला असून टिळकनगर चौकीच्या या पोलीस कर्मचार्‍याने याबाबत अनेकवेळा नदीमला वारंवार दोषी ठरवून विनाकारण त्रास देत मानसिक छळ करून तुला मोठ्या प्रकरणात गुंतवतो अशी धमकी दिली.
हा पोलीस कर्मचारी नदीमच्या पत्नीला परस्पर माहेरी जाऊन भेटण्याच्या प्रयत्न करीत असल्याने नदीम व या पोलीस कर्मचार्‍यात एक ते दीड वर्षांपासून वाद चालू होता.

नदीमने या पोलीस कर्मचार्‍याच्या जाचास कंटाळून टोकाचे पाऊल उचलले असल्याने याप्रकरणी सखोल चौकशी करून संबधितास तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नदीमच्या नातलगांनी केली आहे. दरम्यान पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या