Type to search

Featured नाशिक

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, परिक्षा शुल्क माफ करा; छात्रभारती विद्यार्थी संघटनेची मागणी

Share

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली व कोकण भागात ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पुरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य (वह्या, पुस्तके) सगळ वाहून गेले आहे.

सर्व नागरिकांचे आर्थिक उत्पादनाचे साधन हे शेती आहे यांनी शेतीमालाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे नागरिकांना जगायचा कसे आणि मुलांचे शैक्षणिक शुल्क भरायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण या भागात येऊन गेलेले हे अस्मानी संकट भिषण असुन अतिशय सैरवैर अशी स्थिती सदर नागरीकांची आहे. म्हणुनच अशा स्थितीत जिथे एका वेळेच्या अन्नाची भ्रांत आहे अशा ठिकाणी शिक्षणासाठी आर्थिक चणचण ही मोठ्याप्रमाणावर आहे. स्वत: मुख्यमंत्रीनि या ठिकाणी हवाई दौरा केलेला असुन त्यांना तेथील एकुण परिस्थिती ज्ञात आहे.

छात्रभारती विद्यार्थी संघटनेने ६ दिवसीय दौरा करून तेथील परिस्थिती बघितली आहे. तसेच नागरीकांसाठी जिवनाश्यक वस्तुचां पुरवठा छात्रभारती मार्फत करण्यात आला या दरम्यान विद्यार्थी वर्गामध्ये खुप मोठा संकोच दिसुन आला डोक्यावर छत नाही,पोटात अन्न नाही, कुठे शाळा पडली, कुठे पुस्तके वाहुन गेली, दप्तरच गेलं वाहुन त्यात होती स्वप्न सारी अशी भावना डोळ्यातुन व्यक्त करण्यासारखी आहे.

संदर्भीय परिस्थितील काही गावातील म्हणजेच कोल्हापुर कर्नाटक परिसिमा क्षेत्रातील शाळा छात्रभारतीने दत्तक घेतलेल्या असुन त्यांना पुर्नउभारणीसाठी म्हणजेच शैक्षणिक साहित्य,स्टेशनरी,स्कुल बँग यासारखी मदत केली आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांची संपुर्ण शैक्षणिक शुल्क/परिक्षा शुल्क माफी केले जावे असे निवेदन छात्रभारती विद्यार्थी संघटना तर्फे देण्यात आले. अन्यथा छात्रभारती विद्यार्थी संघटना तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी राकेश पवार, समाधान बागुल, राहुल सुर्यवंशी, सदाशिव गणगे, आम्रपाली वाकळे, निव्रुत्ती खेताडे, देविदास हजारे, वनिता जावळे, संकेत गवई उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!