Thursday, April 25, 2024
Homeनगरविद्यार्थी नाही.. अन् घरच बनली पूर्ण शाळा..!

विद्यार्थी नाही.. अन् घरच बनली पूर्ण शाळा..!

श्रीरामपूर (प्रतिनिधि)- पालिका मौलाना अबुल कलाम आझाद डिजीटल नगरपालिका उर्दू शाळा 4 मधील शिक्षकांचे कोरोना विषाणूमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गेल्या वीस दिवसांपासून पूर्ण ताटाटूट झाली आहे. त्यामुळे या शाळेच्या शिक्षकांनी वर्क फॉर होम प्रशासनाच्या उपक्रमावर भर दिला आहे. दिवसभर खणखणणारे भ्रमणध्वनी व त्यावरील रिंगटोन्स आणि शिक्षकांचा एकमेकांशी वेगवेगळ्या वर्क फ्रॉम होमवर होणारा संवाद यामुळे संपूर्ण घरच विद्यार्थी नसले तरी शाळा बनली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. इतर कार्यालयांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ हा उपक्रम असला तरी शाळांसाठी तो अपरिहार्य ठरत आहे. ऐन परीक्षेच्या काळात आणि वर्षभर केलेले कष्ट वाया जाऊ नये, या दूरदृष्टीने शिक्षकांनी हा ‘वर्क फ्रॉम होम’ खूप मनावर घेतला आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात अनेक कार्यालयांचा कारभार कसाही चालू असला तरी या काळात मात्र, शिक्षकांना विद्यार्थी समोर दिसत नसल्याने ते सैरभैर झाले. शिक्षक सध्या घर कामापेक्षा ‘वर्क फ्रॉम होम’ या कामातच दिवसभर व्यस्त असतात. सकाळी 9 वाजल्यापासून तर दिवसभर केव्हाही सर्व शिक्षकांचे भ्रमणध्वनी वेगवेगळ्या अडी-अडचणीसाठी मुख्याध्यापकांकडे खणखणत असतात.

दिलेला अभ्यास संपला आहे. आता पुढे काय द्यायचे याबाबत शिक्षक मुख्याध्यापकांशी संवाद साधत असतात. कसलाही विलंब न लावता मुख्याध्यापक ही पुढील अभ्यासाचा टप्पा कसा आणि कधी द्यायचा या बाबींवर शिक्षकांना सखोल मार्गदर्शन करतात. विद्यार्थीही हा अभ्यासक्रम पूर्ण काळजीने आणि आनंदाने करताना दिसत आहेत. सकाळ-दुपार-संध्याकाळ अशा तिन्ही वेळी तसेच दिवसभर कधीही वेळी-अवेळी उपाध्यापक अल्ताफ शाह, उपाध्यापिका निशात अखतर शेख, रिजवाना पठाण, कौसर काजी, समीना शेख, शगुफ्ता खान, शगुफ्ता बागवान, फराहदीबा बागवान या शिक्षकांचे वर्क फ्रॉम होम संदर्भात भ्रमणध्वनी खणखणत असतात.

ऐन संचारबंदीच्या काळात हा अनोखा अनुभव आणि वेगळा प्रसंग प्रत्येकास अनुभवयास मिळत आहे, तो आनंददायी असून प्रत्येकासाठी दिशा देणारा शिक्षकांसाठी आव्हानात्मक आहे. मात्र शिक्षकांनी हा उपक्रम मनापासून करण्याचा निश्चय केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या