Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रVideo : मुंबई पोलीस म्हणतात ‘हॉर्न नॉट ओके प्लिज! पण का?

Video : मुंबई पोलीस म्हणतात ‘हॉर्न नॉट ओके प्लिज! पण का?

मुंबई : राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये दिवसेंदिवस ट्रॅफिकची समस्या बिकट होत असताना मुंबई पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. येथील ठिकठिकाणी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी एक नवी वाहतूक नियमावली लागू करण्याचा विचार केला आहे. चौकांमध्ये सिग्नलदरम्यान, होणाऱ्या ध्वनिप्रदूषनाला आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी एफसीबी इंटरफेस कंपनीसोबत करार करत द पनिशिंग सिग्नल नामक एक यंत्रणा कार्यान्वित करणार आहेत.

दरम्यान शहरामधील सिग्नलवर, चौकात येणाऱ्या चारही रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा.. गोंगाट… आणि त्यात हॉर्नचा आवाज…या आवाजांमुळे अगोदरच असलेल्या गोंगाटात अधिकच भर पडते. त्यामुळे एक मिनीटभर असलेला सिग्नलही वाहनधारकांना एक तासांसारखा वाटू लागतो. मग प्रत्येकजण हॉर्न वाजवून इतरांना त्रास देत असतो. यावर नामी शक्कल लढवत मुंबई पोलिसांनी सिग्नलवर यंत्रणा उभारण्याचे नियोजन केले आहे.

- Advertisement -

द पनिशिंग सिग्नल नामक यंत्रणा ही शहरांती चौकांमध्ये बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेमध्ये त्या चौकामध्ये असलेल्या ध्वनिप्रदूषणस कारण ठरणाऱ्या आवाजाचा डेसीबल मोजण्यात येईल. ज्यामुळे शांतताभंग करणाऱ्या मंडळींना चांगलाच धडा मिळणार आहे.

असा काम करेल
समोर लाल दिवा लागला आणि चालकांनी हॉर्न वाजविण्याचा प्रयत्न केला. त्याचा आवाज जर ८५ डेसीबल पेक्षा वर गेला तर सिग्नलचा कालावधी आणखी वाढणार आहे. हा आवाज जितका वाढत जाईल तितका हा कालावधी वाढत जाईल. जोपर्यंत ध्वनिमापक यंत्राचा आवाज ८५ डेसीबलपेक्षा खाली येत नाही तोवर हिरवा दिवाच पेटणार नाही. त्यामुळे वाहन चालकांना आपोआपच स्वत:वर नियंत्रण मिळवत पोलीसांना सहकार्य करावे लागणार आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या