Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

एसटीला कोरोनाची बाधा !

Share

जिल्ह्यात दररोजचा लाखोंचा फटका

अहमदनगर (प्रतिनिधी) – जगभर विळखा घट्ट करणार्‍या कोरोना विषाणूचा फटका सर्वसामान्यापासून ते अर्थव्यवस्थेला बसण्यास सुरुवात झाली आहे. या विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून राज्याची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणार्‍या एसटी महामंडळाला एकट्या नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत लाखो रुपयांचा फटका बसत आहे. यामुळे एसटी महामंडळा समोरील अडचणी वाढणार आहे.

गेल्या आठ दिवसापासून नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. कोरोना बाधित पहिला रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर येणार्‍या प्रत्येक दिवस नगरकरांसाठी अवघड झालेला आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात 145 व्यक्तींचे कोरोनाचे नमुने निगेटिव्ह आले असल्याने विद्यमान परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने जिल्हा लॉकआऊट जाहीर केल्याने नागरिकांनी घरात राहणे पसंत केले आहे. मात्र गरजवंतांसाठी दळवळणाची सरकारी साधने उपलब्ध आहेत. यात एटी महामंडळ अग्रस्थानी आहे.

जिल्ह्यात एसटी महामंडळाचे 11 डेपो असून त्या ठिकाणी 4 हजार 500 वाहक, चालक, अधिकारी, कर्मचारी आणि दुरूस्तीचे काम करणारे मॅकॅनिक कार्यरत आहेत. जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या बसेस् 2 लाख 35 हजार किलो मीटचा प्रवास करतात. यातून लाखो लोकांचा प्रवास सुरू असतो. यातून एसटी महामंडळाचा रोजचा 70 ते 80 लाख रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाचा प्रभाव वाढल्यापासून एसटी महामंडळाची स्थिती वाईट झाली आहे.

अत्यल्प प्रवाशांसाठी एसटी महामंडळाच्या बस रस्त्यावर धावत आहे. यात एसटीचा दुहेरी तोटा होत असून एसटी फेरीत डिझेल, वाहक आणि चालकांचा पगार यासह एसटी बसची झीज आणि नियंत्रणासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांचा पगार चुकत नसून दुसरीकडे कमी प्रवासी घेऊन बस धावत असल्याने उत्पन्नात देखील 60 ते 70 टक्के तूट आलेली आहे. यामुळे आधीच अडचणी असलेले एसटी महामंडळ आणखी तोट्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या 1 ते सव्वा लाख किलो मीटर एसटीच्या फेर्‍या होत असल्याचे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी सांगितले.

नगर डेपोतून अवघ्या तीन फेर्‍या
एसटी महामंडळाचे जिल्ह्यात 11 डेपो आहेत. यातील नगर मुख्यालयात असणार्‍या नगर डेपोतून शनिवारी दिवसभरात एसटी बसच्या वांबोरी मार्गावर अवघ्या तीन फेर्‍या झाल्या. डेपोतून उर्वरित कोणत्याच गावाला एसटी बस सोडण्यात आली. प्रवासी नसल्याने जवळपास डेपोतील सर्व बस आणि चालक-वाहक निवांत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!