Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० सामन्यास सुरवात; विराट कोहलीस विश्रांती

Share
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० सामन्यास सुरवात; विराट कोहलीस विश्रांती Latest News Sport India Start New Zealand T-20 Match

नवी दिल्ली : न्यूझीलंड आणि भारत यादरम्यान टी-२० मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना माउंट मौंगानुई येथील बे ओव्हल येथे होत आहे. आजच्या सामन्यात टॉस जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. संजू सॅमसन प्लेयिंग इलेव्हनमध्ये कायम ठेवण्यात आल्याने तो केएल राहुलसह डावाची सुरुवात करेल आणि रोहित तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल.

दरम्यान मागील दोन सामन्यातील रोमांचक विजयानंतर आजच्या सामन्यात न्यूझीलंड संघाला व्हॉईटवॉश देणार का ? हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. न्यूझीलंडने एखाद्या द्विदेशीय टी-२० मालिकेत (तीन किंवा पेक्षा अधिक सामने) यापूर्वी एकदाही सर्वही सामने गमावलेले नाहीत. त्यामुळे, आज नामुष्की टाळणे, हे त्यांच्यासमारील मुख्य आव्हान असेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!