Friday, April 26, 2024
Homeक्रीडाटीम इंडिया मालिकेतील आव्हान कायम राखणार?

टीम इंडिया मालिकेतील आव्हान कायम राखणार?

विशाखापट्टणम : भारत आणि वेस्टइंडीज या दोन संघांमध्ये सध्या ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघ १-० ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर मालिका गमावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा सामना डॉ वाय एस राजशेखरा रेड्डी या मैदानाव बुधवारी १८ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी १:३० वाजता खेळवण्यात येणार आहे.

या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या भारत ३५६-९ विरुद्ध पाकिस्तान ५ एप्रिल २००५ नीचांकी धावसंख्या ७९ न्यूझीलंड विरुद्ध भारत २९ ऑक्टोबर २०१६ सर्वात मोठा विराज भारत १९० धावांनी विरुद्ध न्यूझीलंड २९ ऑक्टोबर २०१६ निसटता विजय भारत ५८ धावांनी विरुद्ध पाकिस्तान ५ एप्रिल २००५ सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली ५ सामने १ नाबाद ५५६ धावा सर्वाधिक स्कोर १५७* सर्वाधिक शतके विराट कोहली ३ सर्वाधिक अर्धशतके विराट कोहली २ सर्वाधिक शतके १० एम एस धोनी सर्वाधिक बळी राणा नावेद १० षटके ० निर्धाव ५४ धावा ३ विकेट्स बेस्ट बॉलिंग फिगर १० षटके ६० धावा ४ विकेट्स रवी रामपॉल यष्टीरक्षक कामगिरी ७ झेल ३ यष्टीचित एकूण १० धोनी सर्वाधिक झेल १ सामना ३ झेल.

- Advertisement -

भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार रोहित शर्मा , विराट कोहली , लोकेश राहुल , श्रेयस अय्यर , मनीष पांडे ,रिषभ पंत , केदार जाधव यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये वॉशिंग्टन सुंदर , शिवम दुबे रविंद्र जडेजा आहेत. गोलंदाजीत मोहंमद शमी , शार्दूल ठाकूर , दीपक चाहर , कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल आहेत.

विंडीज संघांच्या फलंदाजीची मदार इविन लुईस , शिमोन हेटमायर , ब्रेंडन किंग , निकोलस पुरण दिनेश रामदिन आहेत. . अष्टपैलूंमध्ये जेसन होल्डर , किरॉन पोलार्ड , शेफने रुदरफोर्ड केसरीक विल्यम्स आहेत. गोलंदाजीत जेसन होल्डर , किमो पॉल केसेदिक विल्यम्स खरी पिरे आहेत..

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या