Type to search

Breaking News ब्लॉग मुख्य बातम्या

जागतिक चिमणी दिवस : एक घास चिऊताईचा… फक्त पुस्तकांतच

Share
जागतिक चिमणी दिवस : एक घास चिऊताईचा... फक्त पुस्तकांतच Latest News Special Day World Sparrow Day Where Did The Sparrow Gone

‘हे चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या’ हे ग. दि. माडगूळकरांचे गाणे आजच्या दिवसाला पूर्णपणे लागू होते. असे म्हटले तर चुकीचे ठरता कामा नये, एक घास चिऊताईचा असे म्हणून आई आपल्या बाळाला एक -एक घास मायेने भरवते. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. कुठेतरी प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. सध्यातरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले आहे. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

शहरात मातीची भिंत किंवा कौलारू घरे पाहावयास मिळत नाहीत. अंगणात धान्य निवडणारी महिला दिसत नाही. अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी बागडणारी चिमणी कुठे दिसणार? सिमेंटच्या जंगलात झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्याने अपवादात्मक झाडे आपल्या नजरेस पडतात. कधी काळी चिमण्यांच्या चिवचिवाटामुळे होणारी सकाळ आता केवळ आठवणींची स्थिती झाली आहे.

या पार्श्वभूमीवर चिमण्यांचे संरक्षणआणि त्याविषयीच्या जागृतीसाठी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांच्या संख्येस कारणीभूत ठरला. एकीकडे मुंबई पुणे या महानगरात सामान्यतः आढळणारी चिमणी म्हणजे इंडियन कॉमन स्पॅरोचे दर्शन दुर्मिळ होत असताना पर्यावरणाच्या संवर्धन निमशहरी भागातील काही शहरात अनेक प्रकारच्या चिमण्या सकाळ संध्याकाळ गुंजारव करतात. यासाठी आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या बागेत परिसरात जर खाद्यपदार्थाची सोय असेल, तर आपल्याला चिमण्या दिसू शकतील. याचाच अर्थ असा नाही कि आज आपण बर्ड फीड ठेवले आणि उद्या ८-१० चिमण्या दिसतील. चिमण्यांना याची सवय होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो.

चिमणी आणि पिटकांठ किंवा रान या दोन प्रकारच्या चिमण्या आढळून येतात. यातील हाऊस स्पॅरो अर्थात आपल्या परिसरात दिसणारी चिमण्यांची संख्या सध्या कमी होत आहे. चिमणी प्रामुख्याने शहरात वास्तव्यास असते. ग्रामीण भागात चिमण्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. प्रमुख अन्न बिया, भात, गहू, बाजरी मात्र शहरात हे खाद्य चिमण्यांना मिळत नाही. खेड्यातील महिला धान्य निवडतानाही चिमण्यांना ते खायला देतात.

शहरी भागात फारशी न दिसणारी चिमणी म्हणजे पीतकंठ तिलाच रान चिमणी असे म्हणतात. ही चिमणी नाशिक शहराबाहेर जंगल परिसरात दिसून येते. विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना मृत चिमणी आढळून आली होती. त्यांनी तिला मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीत नेऊन तिचे परीक्षण केले. ती हाऊस स्पॅरो नसल्याचा निष्कर्ष समोर आला. या चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो. म्हणून तिला पीतकंठ असे म्हणतात. ही चिमणी हरसूल, पेठ इगतपुरी येथे आढळून येते .

-सलिल परांजपे देशदूत नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!