Thursday, April 25, 2024
Homeनगरपोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांची साई मंदिराला भेट

पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांची साई मंदिराला भेट

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार यांनी सोमवारी सायंकाळी शिर्डीत येवून सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या श्री साईबाबा मंदिराला भेट देऊन कोरोना पार्श्वभुमीवर साईमंदिर लॉकडाउन असल्याने येथील सुरक्षेची पाहणी करत प्रवेशव्दारवरील सुरक्षा रक्षकांना सॅनिटाईझर वापर आणि सोशल डिस्टन्सिंग बाबत सक्त सुचना दिल्या.

जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील धार्मिक तिर्थस्थळांंना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी जागतिक तिर्थस्थळ साईबाबांच्या शिर्डीला भेट देऊन आढावा घेतला. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, सहा. पोलीस निरीक्षक दिपक गंधाले, यांच्यासह साई मंदिराचे पोलीस कर्मचारी तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

मागील 17 मार्चपासून साईबाबांंचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशाने मंदिर व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख अखीलेश कुमार यांनी साईमंदिर परिसरात सोमवारी सायंकाळी धुपारती दरम्यान पाहणी करत सर्व प्रवेशद्वारावर वरील रक्षकांकडून माहिती घेतली.

साईमंदिरात किती व्यक्ती येतात तसेच कोरोना विषाणू रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत याची चाचपणी केली आहे. सायंकाळी धुपआरती सुरु असल्याने मंदिरात जाणे टाळून त्यांनी गुरुस्थानमध्ये दर्शन घेत प्रदिक्षणा देखील केली आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वी परमिटरुम फोडून मद्य चोरूच्या घटनांबद्दल त्यांना विचारणा केली असता त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असून आपण देखील याबाबत कारवाई करत असल्याचे अखिलेश कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या