Tuesday, April 23, 2024
Homeनगरसोयाबीनच्या बियाणे किंमतीत वाढ

सोयाबीनच्या बियाणे किंमतीत वाढ

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्याच्या विविध भागात करोनाचा कहर सुरू असतानाच आता पेरणीच्या ऐन तोंडावर सरकारच्या अधीन असणार्‍या महाबीज कंपनीने सोयाबीनच्या किंमतीत वाढ केली रुपयांची दरवाढ केली आहे. क्विंटलमागे एक हजार रुपयांपेक्षा अधिक रुपयांची वाढ केल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.
राज्यामध्ये जवळपास 40 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा केला जातो.

शेतकर्‍यांना सोयाबीन शेतीचा मोठा आधार आहे. एकीकडे मागच्या दोन ते अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याकारणाने आधीच शेतकर्‍यांचा हंगाम वाया गेला आहे. असे असताना आता पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची दरवाढ शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीत आणणारी आहे.

- Advertisement -

सोयाबीन असणार्‍यांची लॉटरी
नगर जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने उत्तम दर्जाचे सोयाबीन राखून ठेवले होते. आता महाबीजने बियाणांची वाढ केली आहे. त्यात या बियाणांची टंचाई असल्याने त्या शेतकर्‍यांकडील उत्तम दर्जाच्या सोयाबीनला जादा भाव मिळणार असल्याने या शेतकर्‍यांची लॉटरी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या