सोनई पोलिसांनी दुसर्‍या दिवशीही पकडले रस्तालूट व दरोड्याचे दोघे आरोपी

jalgaon-digital
3 Min Read

दोघेही आरोपी नेवासा तालुक्यातील; सोनईत एक तर नेवासा पोलीस ठाण्यात दाखल आहेत 4 गुन्हे

सोनई (वार्ताहर) – औरंगाबाद जिल्ह्यातील क्रुझर जीप चालकाला शिंगवे तुकाई शिवारातील नगर-औरंगाबाद हायवे वर दमबाजी मारहाण करून ऐवज घेऊन पसार झालेल्या 2 अट्टल आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. नितीन राशिनकर याचेवर नेवासा पोलीस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की 11 मार्च 2020 रोजी क्रुझर जीप चालक सुपडू तुकाराम सपकाळ रा. शिवना ता. सिल्लोड जिल्हा औरंगाबाद यांना नगर-औरंगाबाद राज्य महामार्ग घोडेगाव येथे हायवे रोडवर शिंगवे तुकाई शिवारात अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलवरून येऊन जीप चालकाला दमबाजी मारहाण करून त्याचे खिशातून 9 हजार रुपये रोख रक्कम व 2 मोबाईल जबरी चोरी करून नेले बाबतची फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात दिली होती.

सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी व सहकार्‍यांनी या गुन्ह्याचा कौशल्याने व कसोशीने तपास करून गुप्त माहितगार खबर्‍याकडून खात्रीशीर माहिती करून आरोपीची उकल करून हा रोड रॉबरी जबरी चोरीचा गुन्हा करणारा संशयित आरोपी नितीन मोहन राशिनकर (वय 26) वर्षे रा. कारेगाव ता. नेवासा व मुक्तेश्वर उर्फ बाली कैलास ठाकर (वय 22) वर्ष रा. रांजणगावदेवी ता. नेवासा यांना त्यांचे गावातून सापळा रचून पाठलाग करून शिताफीने पकडले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोघा आरोपींना सोनई पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल क्र. एमएच 17 बीआर 240 व एक मोबाईल सोनई पोलिसांनी हस्तगत केला आहे पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अटक आरोपी नितीन मोहन राशिनकर हा सराईत असून त्याचेवर नेवासा पोलीस ठाण्यात 275/ 2015 क्रमांकाचा भादवि कलम 143, 147,148, 149, 326 प्रमाणे तसेच सन 2018 मध्ये भादवि कलम 395 प्रमाणे 377/2018 नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायदा कलम 3(1) आर एस प्रमाणे त्याचबरोबर गुन्हा नंबर 43/2011 मुंबई पोलीस अ‍ॅक्ट 122 प्रमाणे तसेच नंबर 469/2019 भादवि कलम 392 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सोनईचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, हवालदार दत्तात्रय गावडे, पोलीस नाईक शिवाजी माने, कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात, गणेश आडागळे, बाबा वाघमोडे या पथकाने आरोपी अटक व मुद्देमाल जप्तीची महत्वपूर्ण कामगीरी केली.

घोडेगाव व बीडच्या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील सराफ दुकान फोडी व घोडेगाव चर्चजवळ घातक शस्त्रांसह 25 एप्रिलचे पहाटे तीन वाजता सोनई पोलिसांनी अटक केलेले आरोपी बाळू दशरथ गायकवाड, संदीप शंकर पवार, राहुल साहेबराव वैरागर तिघेही रा. घोडेगाव ता. नेवासा तसेच बीड जिल्ह्यातील सिकंदर अख्तर सय्यद रा. मोमीनपुरा (बीड), शंकर तानाजी जाधव रा. नेहरूनगर (बीड) या पाच आरोपींना तपास अधिकारी ज्ञानेश्वर थोरात यांनी नेवासा न्यायाधीश श्री. पाचरणे यांचे समोर हजर केले असता त्यांनी आरोपीना मंगळवार 28 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *