Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसिन्नर : वारेगाव (पाथरे) येथील करोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबातील चौघे निगेटिव्ह

सिन्नर : वारेगाव (पाथरे) येथील करोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबातील चौघे निगेटिव्ह

सिन्नर : तालुक्यातील वारेगाव (पाथरे) येथील एकाच कुटुंबतील दोघांच्या करोना चाचण्या पॉजिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी असून त्या रुग्णांच्या कुटुंबातील अन्य चार व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

वारेगाव (पाथरे) येथील मालेगाव प्रवासाचा इतिहास असलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीपाठोपाठ त्याच्या मुलाचा करोना तपासणी अहवाल देखील पॉजिटिव्ह आला होता.

- Advertisement -

पहिल्या रुग्णाचा अहवाल आल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून या कुटुंबाच्या संपर्कातील १३ जणांना व एका वैद्यकीय अधिकाऱ्याला तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. तर रुग्णांच्या कुटुंबातील अन्य चार पैकी दोघांचे अहवाल निगेटिव्ह असून गुरुवारी दि.२३ रात्री अन्य दोघांचे अहवाल देखील निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली.

मालेगाव येथून परतल्यावर गेल्या ११ एप्रिल रोजी पॉझिटीव्ह अहवाल आलेले दोन्ही रुग्ण व त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा त्यानंतर कोणाशीही संपर्क आलेला नाही. तर गावात असताना त्यांच्याशी जवळून आलेल्या व्यक्तींचे अहवाल देखील निगेटिव्ह आले असून ते सर्वजण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

त्यामुळे पाथरे व परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी व गावात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन डॉ. बच्छाव यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या