Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीरामपूरचे अट्टल सोनसाखळी चोर गजाआड

Share
वडझिरे गोळीबार प्रकरण; आरोपीच्या मुसक्या आवळल्या, Latest News Vadzhire Criminal Arrested Parner

शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी केले अटक

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डीमध्ये साईश कॉर्नर परिसरात दोन सोनसाखळी चोरट्यांनी एका भाविक महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडल्यानंतर भरधाव पळून जात असताना त्याठिकाणी सजग असलेल्या शिर्डी ग्रामस्थांनी त्यांना पकडून यथेच्छ धुलाई केली. तसेच त्यास शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांंच्याविरूध्द शिर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांंना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, शिर्डी शहरात मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरांनी धूमस्टाईलने मोटारसायकलवर येऊन महिला भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पलायन करण्याचे प्रमाण वाढले होते त्याअनुषंगाने प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, सहा.पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोसइ प्रवीण दातरे, पोसइ संजय सोनवणे, पोसइ बारकू जाणे, वैभव रुपवते, यांच्यासह शिर्डी पोलीस ठाण्यातील कर्मचारी पो.ना.गडाख, पो.ना.वाळके, पो.ना.अंधारे, पो.ना.मकासरे, पो.ना.सोनवणे, पो.ना.दिनकर, पो.ना.किरण कुर्‍हे, पो. कॉ. फिरोज पटेल, पो.कॉ.पगारे, पो.कॉ. राम वेताळ, पो.कॉ. कैलास राठोड आदींनी शिर्डी शहरासह परिसरात नाकाबंदी व पेट्रोलींग सुरू केली.

उपविभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना गुप्त खबर्‍यांंकडून बातमी मिळाली होती की शहरात सोनसाखळी चोरी करणारे सराईत गुन्हेगार सुनील उर्फ छगन देवराम पवार (वय 24), रा.पारधीवाडा, परतुर जि.जालना.व विजय राजू पिंपळे वय 23 रा.पाटोदा. जि.औरंगाबाद सध्या दोघेही रा.अशोकनगर, श्रीरामपूर असून सोनसाखळी चोरी करण्यासाठी शहरात येत असल्याची समजले होते. दरम्यान दि.4 रोजी सायंकाळी साईश कॉर्नर येथे गस्त दरम्यान यातील नमूद आरोपींनी एका महिला भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून भरधाव पळून जात असताना तेथे असलेल्या सजग नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून पकडले आणि बेदम चोप दिला.

जवळच गस्त घालत असलेल्या पोलिसांना घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करून शिर्डी पोलीस ठाण्यात आणले असता त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. भाविक महिलेच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं 203/2020 नुसार भा.द.वि.कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सदर गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. या आरोपींनी शिर्डी शहरांमध्ये यापूर्वीही अनेक गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. सदर आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून सदर आरोपी हे बाहेरील राज्यांमधील महिलांना टार्गेट करून त्यांच्या सोनसाखळी ओरबडून घेत असतात. तसेच याकामी चोरीच्या गाड्यांचा वापर ते करतात, असे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. सध्या आरोपींच्या ताब्यात असलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपींना राहाता येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक वाकचौरे यांनी सांगितले. पुढील तपास पो.स.ई. बारकू जाणे करीत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!