Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपुर हद्दीत होणार थर्मल स्कॅनिंग

श्रीरामपुर हद्दीत होणार थर्मल स्कॅनिंग

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासन विविध उपाय योजना राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर -वैजापूर हद्दीवर थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्याचे मशीनही उपलब्ध झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली.
 श्रीरामपूर शहर व तालुका परिसरामध्ये सध्या कोरोणाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे कोरोणाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रशासन दिवसरात्र काळजी घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर-वैजापूर हद्दीवर थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे.
श्रीरामपूर हद्दीत  नाऊर रोडला सध्या चेक पोस्ट नाका सुरू आहे. त्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग मशीन बसविण्यात येणार आहे. त्यामुळे जाणार्‍या येणाऱ्या प्रत्येकाची याठिकाणी स्कॅनिंग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या