Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीरामपुरात ‘नवोदय’च्या परीक्षेला नंबराची गफलत !

Share
श्रीरामपुरात ‘नवोदय’च्या परीक्षेला नंबराची गफलत !, Latest News Shrirampur Navodya Exam Seat No. Problems

564 विद्यार्थ्यांनी दिली नवोदय परीक्षा; 56 विद्यार्थ्यांची दांडी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 564 विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिली. तालुक्यातून एकूण 620 विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला होता. यापैकी 56 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. दरम्यान, श्रीरामपुरातील भि.रा.खटोड कन्या विद्यालयातील 2 खोल्यांमध्ये परीक्षार्थींचे आसन क्रमांक 7 अंकी असताना केवळ 6 अंकी टाकण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडाल्याचा प्रकार बघावयास मिळाला.

जवाहर नवोदय विद्यालय अहमदनगर यांच्यावतीने जवाहर नवोदय विद्यालय पात्र केंद्रस्तरीय परीक्षा काल घेण्यात आली. यासाठी श्रीरामपूर शहरातील भि.रा.खटोड कन्या विद्यालय व क.जे. सोमैय्या हायस्कुल या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. दरवर्षी जवाहर नवोदय विद्यालय पात्र परीक्षा घेण्यात येते. काल इयत्ता 5 वी तील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये बुध्दीमापन, अंकगणित व मराठी या विषयांबद्दल 100 गुणांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालानंतर गुणवत्ता यादीनुसार पात्र विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड करण्यात येणार आहे.

दरम्यान, या परीक्षेसाठी श्रीरामपूर शहरातील भि.रा.खटोड कन्या विद्यालय व क.जे. सोमैय्या हायस्कुल हे दोन केंद्र होते. मात्र यापैकी भि.रा.खटोड कन्या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकांची मांडणी करताना प्रशासनाकडून चूक झाल्याचे दिसून आले. खोली क्रमांक 2 व 15 वर परीक्षार्थींचा आसन क्रमांक 7 अंकी असताना तो बेंचवर 6 अंकी टाकण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची चांगलीच धावपळ उडाली. त्यानंतर पालक व शिक्षकांच्या तक्रारीनुसार वेळीच प्रशासनाने दुरुस्ती केल्याने परीक्षा सुरळीत पार पडली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!