Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

विषय समित्या निवडीचा ‘अ‍ॅटमबॉम्ब’ फुसका !

Share
सभाविषय समित्या निवडीचा ‘अ‍ॅटमबॉम्ब’ फुसका !, Latest News Shrirampur Nagradhyksh Meeting Canceledपती निवड वादाची आज जिल्हाधिकार्‍यांपुढे सुनावणी, Latest News Speaker Selected Collecter Hearing Shrirampur

श्रीरामपूरच्या नगराध्यक्षांनी बोलाविलेली आजची विशेष सभा अचानक रद्द

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर नगरपालिकेतील विषय समित्यांच्या निवडीसाठी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन बोलाविलेली आजची विशेष बैठक काल दुपारी अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे विषय समित्या निवडीचा ‘अ‍ॅटमबॉम्ब’ फुटण्यापूर्वीच फुसका ठरला आहे. ही सभा रद्द झाल्याने सत्ताधारी आदिक गटात नाराजी तर विरोधी ससाणे गटाने समाधान व्यक्त केले आहे.

यापुर्वी दि. 21 जानेवारी रोजी नगरपालिकेच्या विषय समित्या निवडीसाठी पिठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतू गटनेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावेळी सदर निवडी स्थगित ठेवण्यात आल्या होत्या.

त्यानंतर नगराध्यक्षा आदिक यांनी विषय समित्या निवडीसाठी आज दि. 11 रोजी विशेष बैठक बोलाविली होती. शहरातील विकासकामांना चालना देण्यासाठी तसेच कामे लवकर पूर्ण करण्याच्या हेतूने नगरसेवकांच्या मागणीवरुन तसेच पालिकेतील प्रशासन व शहर विकासासंदर्भात कामकाजाचे दृष्टीने पालिकेत विषय समित्या होणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकर बैठक आयोजित करावी, असे पत्र नगरसेवकांच्या सहीने दि. 5 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षांना दिले होते.
त्यानुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 81 नुसार आज दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलावली होती. त्याबाबत प्रत्येक नगरसेवकांनाही निवडीप्रसंगी उपस्थित राहण्याच्या नोटीसा नगराध्यक्षांनी पाठविल्या होत्या.

या नोटिसा मिळाल्यानंतर विरोधी गटाचे उपनगराध्यक्ष करण ससाणे व नगरसेवक गैरवापर करून बेकायदेशीररित्या सदर विशेष सभेचे आयोजन केले आहे. गटनेतेपदाचा वाद उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबीत आहे.
यापूर्वी आपल्या कार्यालयाने श्रीरामपूर नगरपालिका विषय समित्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यासाठी प्रांताधिकारी, श्रीरामपूर यांची नियुक्ती केली होती. सदरच्या सभेत गटनेतेपदाचा वाद उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबीत असल्याने सदरच्या निवडी करता येत नसल्याचे पीठासन अधिकार्‍यांनी जाहीर केले आहे. तरी नगराध्यक्षांनी दि. 11 रोजी बोलाविलेली बेकायदेशीर सभा रद्द करण्याचे आदेश संबधितांना त्वरित द्यावेत, अशी विनंती या तक्रार अर्जात करण ससाणे व मुज्जफर शेख यांनी केली होती.

दरम्यान काल दुपारी अचानक विषय समित्या निवडीसाठी आज (दि.11) होणारी विशेष बैठक काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याचे नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी आपल्या सहीने लेखी पत्राद्वारे सर्व नगरसेवकांना कळविले. त्यामुळे विषय समित्या निवडी पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत.

चुकीच्या सल्लागारामुळे असे होणारच
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे. नगरपरिषदेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत अनेक नगराध्यक्ष होऊन गेले, त्यामध्ये काही उच्च शिक्षण घेतलेले होते. परंतू आज घडलेल्या घटनेवरून नगराध्यक्षांचे कायद्याचे अज्ञान उघड झाले आहे. त्यांच्या अति अभ्यासाची किव येते. सल्लागार चुकीचे असल्याने असेच होत राहणार..
-भारती कांबळे, गटनेता, महाविकास आघाडी.

अचानक काम आल्याने सभा रद्द
विषय समित्यांच्या निवडी झाल्या तर काम विभागले जाईल, प्रत्येक ठिकाणी लक्ष देेणे शक्य होईल, त्यामुळे विषय समित्या निवडी होणे गरजेचे आहे. गेले तीन वर्षापासून मी एकटीच काम पहाते. त्यामुळे प्रत्येक कामामध्ये लक्ष घालता येत नाही. विषय समित्या निवडीवर चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित केली होती. परंतू मला अचानक काम आल्यामुळे सदर विशेष सभा रद्द करण्यात आली आहे.
– अनुराधाताई आदिक, नगराध्यक्षा.

कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही !
हुकूमशाही पद्धतीने कारभार हाकणार्‍या नगराध्यक्षा आदिक यांनी जिल्हाधिकारी यांचेही अधिकार हिरावण्याचे काम केले. सर्वच अधिकार मलाच या अविर्भावात असणार्‍या नगराध्यक्षांना झटका बसला असून कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही, हे यावरुन सिध्द झाले आहे.
– करण ससाणे, उपनगराध्यक्ष.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!