Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीरामपूर : गोंडेगावात विहिरीत आढळला मुलीचा मृतदेह

Share
चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला, Latest News Shrirampur Missing Girl Dead Body Well

गोंडेगाव (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह काल सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत आढळून आला.

गोंडेगाव येथील रूपाली नवनाथ तांबे (वय 17) ही मुलगी पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस तिचा शोध घेत होते. याच दरम्यान काल सकाळी तिचा मृतदेह दिगंबर तांबे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक मसूद खान फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रूपाली तांबे हिच्या पश्‍चात वडील, बहीण असा परिवार आहे. सदर मुलीने आत्महत्या का केली? का घसरुन पडली ? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत असून याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक मसूद खान व हवालदार अशोक गायकवाड करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!