Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपुरात अल्पसंख्याकांसाठी हुनर हब

श्रीरामपुरात अल्पसंख्याकांसाठी हुनर हब

57 लाखांपैकी 17.10 लाखांचा निधी पहिल्या टप्प्यासाठी मंजूर

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत गठीत शक्तिप्रदान समितीने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अल्पसंख्याक समाजासाठी हुनर हब बांधकामाच्या 57 लाखांच्या रकमेच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 17.10 लाख इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या हुनर हबच्या कामाचा मार्ग सुकर झाला आहे.

- Advertisement -

या हुनर हबसाठी राज्य शासनाचा हिस्सा 60ः40 या प्रमाणात असून केंद्र शासनाचा हिस्सा 34.20 लाख आणि राज्य शासनाचा एकूण हिस्सा 22.80 लाख रूपये आहे. यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी श्रीरामपूर येथे या हुनर हब बांधकामासाठी 63.69 लाख रूपयांच्या किंमतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला.

केंद्राने प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातंर्गत श्रीरामपूर येथे 57 लाख रूपये किमतीच्या हुनर हब बांधकामाच्या प्रस्तावास काही अटींवर मंजुरी दिली आहे. श्रीरामपूर नगर परिषदेमार्फत या हुनर हबचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या