Wednesday, May 8, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात 3 हजार 984 कॉरंंनटाईन

श्रीरामपूर तालुक्यात 3 हजार 984 कॉरंंनटाईन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – देशामध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असून ही चिंतेची बाब आहे. प्रशासनाकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्व प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून श्रीरामपूर शहर व तालुक्यातील 55 गावे मिळून काल अखेर 3 हजार 984 नागरिकांना कॉरंनटाइन करण्यात आले आहे.

यामध्ये परदेशातून आलेल्या 30, राज्य बाहेरून आलेल्या 116, जिल्हा बाहेरील 3618 तर तालुका बाहेरील 219 जणांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पंचायत समिती वैद्यकीय विभाग, तालुका ग्रामीण आरोग्य केंद्र, श्रीरामपूर नगरपालिका आरोग्य विभाग यांच्यावतीने सर्वत्र जनजागृती सुरू आहे. तसेच याबाबतच्या सूचना ही देण्यात येत आहेत.

- Advertisement -

शहरी भागात 3 वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण भागात 12 वैद्यकीय अधिकारी, शहरात सतरा तर ग्रामीण भागात 148 वैद्यकीय कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत. नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना त्यांच्याकडून दिल्या जात आहेत.

तालुक्यातील 55 गावांत प्राथमिक आरोग्य केंद्रातून सर्वतोपरी आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. तरीही नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आपल्या परिसरात एखादी व्यक्ती बाहेरून आलेली असेल तसेच अनोळखी असेल त्या व्यक्तीबाबत आपल्या शेजारील आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या